माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक खुशालसिंग (राणा) ठाकुर यांच्या वाढदिवसानिमीत्त फेंटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जालना जिल्हा फेंटबॉल असोसिएशन यांच्या वतीने दि. 4 ते 6 जानेवारी 2024 दरम्यान जेईएस कॉलेज जालना येथे आयोजीत दुसर्या राज्यस्तरीय सब ज्युनीयर, ज्युनीयर, सिनीयर तसेच पहिल्या मिनी सब ज्युनीयर फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
स्पर्धेचे उद्घाटन खुशालसिंग (राणा) ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्नीहोत्री, विशेष उपस्थिती मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, बबन दादा सोरटी, क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेसी, क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद, संतोष वाबळे, देवगिरी इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापीका प्रा. गायत्री सोरटी, वरीष्ठ उपाध्यक्ष मिर्झा ईकबाल, उपाध्यक्ष सौ. रूपाली पवार तसेच जालना शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेत महाराष्ट्रातुन जालना, छ. संभाजी नगर, बिड, बुलढाणा, पुणे, जळगांव असे 9 जिल्ह्यांचे 19 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेते पद जालना जिल्ह्याने पटकावले तर पुणे जिल्हा दुसर्या क्रमाकांवर राहिला. तिसर्या स्थानावर जळगांव जिल्हा राहीला.
स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता असोसिएशनचे संस्थापक तथा सचिव शेख चाँद पी.जे., आयोजन समीतीचे अध्यक्ष शेख अहेमद, डॉ. हेमंत वर्मा, सुरेश त्रीभुवन, प्रविण जाधव, उमेशचंद्र खंदारकर, सचिन आर्य, विजय गाडेकर, अमोल काटकर, वैभव किरगत, संतोष गर्जे, सुरेश सावंत, नरेश शिंदे, नितीन जाधव, मारूफ खान, संतोष वाघ, ऋषी डोंगरे, युवराज गाढेकर, शेख मतीन, अकबर रजा, शेख सरताज, अजीम खान, शेख समीर, सोहेल खान, आर्यन जाधव, शेख साबेर तसेच आयोजन समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अथक परीश्रम घेतले.