जालना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा अस्ति कलश तीन दिवस जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते तदनंतर बुधवार रोजी शहागड येथील गोदावरी नदीच्या पात्रात अस्थि विसर्जन कार्यक्रम जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या आणि शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण होऊन सुअश्रुंनी उपस्थित त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.
बुधवार रोजी स्व. अजित दादा पवार यांचा अस्थीकलश रथ दुपारी बारा वाजता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून निघून सायंकाळी पाच वाजता शहागड येथे पोहोचला जालना शहरातून मस्तगड , गांधी चमण, शनी मंदिर चौक , नूतन वसाहत,ह लहुजी चौक, स्व. मदर तेरेसा चौक अंबड चौफुली येथे मोठ्या संख्येने उपस्थित लोकांनी अस्थिकलशाचे अभिवादन करून दर्शन घेतले शहागड कडे अंबड रोडने मार्गस्थ होत असताना इंदेवाडी अंतरवाला गोलापांगरी शेवगा फाटा पारनेर अंबड शहापूर धाकलगाव वडीगोद्री येथील ग्रामस्थांनी अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
अस्थी विसर्जन करताना जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांना दु :ख अनावर झाल्याने त्यांचा अश्रूंचा बांध फुटला याप्रसंगी आ. हिकमत उढाण , माजी मंत्री राजेश टोपे माजी आमदार शिवाजीराव चोथे , माजी आ. सुरेशकुमार जेथलिया , प्रदेश उपाध्यक्ष मधुकरराव आर्दड , शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे , शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद , शकुंतला ताई कदम, रवींद्र तौर, महिंद्र पवार, जयमंगल जाधव, चंद्रकांत कारके प्रा. सोपानराव तेलगढ, अण्णासाहेब चितेकर , मिर्झा अन्वर बेग , केशव जंजाळ , लक्ष्मण दळवी , पुष्पाताई चव्हाण, प्रभाकर घेवंदे , कैलाश मदन , अविनाश कवळे , दत्तू अंभोरे , सुरेश सपाटे, गणेश कावळे , मनोहर उघडे , सुरेश उघडे , बबन गाडेकर , विठ्ठल बरकुले , संतोष डेंगळे, रिंकल तायड , शितल बारोटे , वंदना खांडेभराड, प्रभाकर तांबे , पद्माकर हांडे, विजय सोनवणे , शिवराज जाधव , गणेश डुकरे , कैलाश मगरे , संदीप पाटोळे , दिलीप क्षीरसागर , मुक्तार खान पठाण, उमेश मोहिते, सिद्ध शिंदे समाधान राठोड , राहुल राठोड, जावेद अली , संतोष निकाळजे आदीं पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .