भाजप जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते गायत्री नगरमध्ये ₹1.25 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

जालना/प्रतिनिधी, दि.20
जालना महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ०१ मधील गायत्री नगर येथे एकूण १ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळा भाजप महानगर जिल्हाध्यक्ष श्री.भास्कर आबा दानवे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
या विकासकामांमध्ये महादेव बोदुने ते संजय पवार यांच्या घरापर्यंत रस्ता निर्माण (₹७५ लाख), शिंदे सर यांचे घर ते गजानन ओझा यांच्या घरापर्यंत सी.सी. रोड (₹२५ लाख), तसेच श्री. त्रिपाठी यांच्या घरापासून मैदानापर्यंत सी.सी. रोड (₹२५ लाख) अशा तीन प्रमुख कामांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना श्री. भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, “गायत्री नगरमधील नागरिकांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा, विधुतीकरण आणि उर्वरित रस्त्यांचे काम लवकरच हाती घेतले जाईल.”
यावेळी श्री. सुखदेव मांटे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रा. कपिल दहेकर, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमन मित्तल, अनिल ढवळे, गजानन ओझा, हरीश ओझा, वेदप्रकाश त्रिपाठी, जयेश धोत्रे, विठ्ठल वाघमारे, शुभम खरगे, प्रशांत चव्हाण, राजू गडगिळे, रामप्रसाद बैरागी, जाधव सर, रुदेश चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या अपेक्षा पूर्ण होणार असून, मूलभूत गरजांमध्ये सुधारणा होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.