राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बंद मागे घेऊन मुक निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. कैलास गोरंटयाल, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी बाबू पवार, माजी गटनेते गणेश राऊत बाबूराव सतकर, राम सावंत, शहर जिल्हाप्रमुख बाला परदेशी, युवा नेते अक्षय गोरंटयाल, महीला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार, वसंत जाधव, गंगुबाई वानखेडे, मनकर्णाताई डांगे, मंगल मिटकर, शितलताई तनपुरे, दिनकर घेवंदे, शेख इब्राहिम, वैभव उगले, राजेंद्र जाधव, रमेश गौरक्षक, विनोद रत्नपारखे, जगदीश भरतीया, राधाकिसन दाभाडे, शेख शकील, आनंद वाघमारे, सय्यद अझहर, शेख रफीक, बालाजी रोडे, कपिल भुरेवाल,आरेफ खान, दुर्गेश काठोठीवाले, घनशाम खाकीवाले, मंगलताई खांडेभराड, विभा लाखे, इसा पठाण, संगीता पाजगे, विजय पवार, संतोष माधोवाले, विज्ञानेश्र्वर धानुरे, अरुण सरदार, जयाजी देशमुख, मनोहर उघडे, सोपान तिरुखे, जयंत भोसले, विश्वंभर भुतेकर, कलीम वस्ताद, गुड्डू खान, शेख शमशोद्दिन, गणेश चांदोडे, वैशाली सरदार, मंदाताई पवार, मथुराबाई साळुंके, किशोर गरदास, युवराज राठोड, शिवप्रकाश चीतळकर, राम कुऱ्हाडे, बाबासाहेब सोनवणे, जावेद अली, मंजू यादव, गणेश वाघमारे, बजरंग राजपूत, योगेश पाटील, नारायण शिंदे, भास्कर रत्नपारखे, चंद्रकांत रत्नपारखे, सीताराम तुपे, प्रल्हाद अल्हाट यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.