महात्मा जोतिबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त 11 मार्च, गुरूवार रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील जालना शहर महापालिका कार्यालयासमोरील पृर्णाकृती पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या विचारपीठावर विविध स्तरातील मान्यवरांचा महात्मा ज्योतीबा फुले गौरव सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यावेळी महाप्रसाद लाडुचे वाटप होणार आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये माजी अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव मोरे, भीम सेनाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरभाई निकाळजे, अब्दुल सगीर अहमद, सामाजिक कार्यकर्ता सुनिल रत्नपारखे, विलासदादा डोळसे, निखील पगारे, सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ पवार, महेंद्र शिंदे, महेंद्र रत्नपारखे, पत्रकार धनंजय देशमुख, जेष्ठ पत्रकार मधुकर मुळे, पत्रकार राहुल मुळे, सुनिल खरात, प्रेस फोटोग्राफर किरण खानापुरे, बाबुराव मामा सतकर, शिवलाल घाडगे, कदीम ठाण्याचे ज्ञानदेव नागरे, कैलास जावळे, महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर अशोक कटारिया, अभियंता सय्यद सऊद, प्रफुल्ल अंबेकर, बंडु चव्हाण, डॉ. विशाल धानुरे, अमोल धानुरे, अमरदिप शिंदे, ऋतुजा खरात , इब्राहिम शेख, सय्यद अकीम, बाबाखान आदिंचा सन्मान करण्यात येणार आहे. या मान्यवरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ज्ञायतत्व या विचारांवर कार्य करून, गोरगरीबांना कोरोना काळात अन्नदान केले. तसेच मानवतेच्या दृष्टीने जनकल्याणचे कार्य सुध्दा केलेले आहे. यामुळे महात्मा फुले गौरव सन्मान पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष सुरेश पुंजाराम रत्नपारखे, व्यवस्थापक बाबासाहेब शिवाजी वानखेडे, सचिव रामेश्वर खांडेभराड, महेंद्र शिंदे, गणेश जाधव, शिवलाल गाडगे, सुभाष सातपुते, कडुबा वाकीकर, फिलीप उगले यांनी केले आहे.