pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री गणेश प्रोव्हीजन स्टोअर्स उरण कोटनाका येथील दुकान मालकासह दुकानाचे कर्मचारी यांनी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची केली सेवा

0 3 8 6 5 4

उरण/प्रतिनिधी, दि.6

श्री गणेश प्रोव्हीजन स्टोअर्स उरण कोटनाका येथे दुकान मालकासह दुकानाचे कर्मचारी यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पारंपारिक वेशभूषा धारण करून आपली सेवा विठुराया चरणी अर्पण केली आहे.उरण मध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठलाविषयी असलेली भक्ती प्रेम आस्था या वेषभुषेतून दिसून आली.यावेळी गणेश गायकवाड, प्रसाद गायकवाड, रितेश गायकवाड, धर्मेंद्र पाटील,संदीप जाधव,दिनेश गोवारी,लोचन गायकवाड, अतुल पवार, अनिता पाटील,गीता पाटील, ज्योस्ना पांचाळ,जयमाला पवार आदी विठ्ठल भक्तांनी दुकानात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आपले दैवत मानूण त्याला चांगली सेवा दिली. त्याचे आदरतिथ्य केले.अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या पद्धतीने उरण मध्ये पहिल्यांदा श्री गणेश प्रोव्हीजन स्टोअर्स कोटनाका उरण यांच्या वतीने आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे