pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी ची महापुजा संपन्न

दुसरबीड येथील उद्योजक श्री वसंतराव उदावंत व सौ.अनिता उदावंत दाम्पत्याच्या हस्ते विधीवत पूजा संपन्न

0 3 1 2 8 3

जालना/प्रतिनिधी, दि.05

सांवळे सुंदर रूप मनोहर | राहो निरंतर हृदयी माझें ||अणिक कांही इच्छा आम्हां नाही चाड | तुझें नाम गोड पांडुरंगा || जन्मोजन्मी ऐसें मागितले तुज| आम्हांसी सहज द्यावें आतां || तुका म्हणे तुज ऐसें जी दयाळ | धुंडितां सकळ नाहीं आम्हां || सरत्या वर्षाला निरोप व चालू वर्षात पदार्पण अशा या मुख्य पर्वावर सकाळी चार वाजता पूजेला प्रारंभ झाला .काकडा भजनाचा निनाद व मंगल वाद्यांच्या मधुर आवाजात पूजेला प्रारंभ झाला दुसरबीड येथील उद्योजक ह भ प वसंतराव उदावंत व सौ अनिता उदावंत या दांपत्यांचे नावाचा व गोत्राचा संकल्प केला. व कलश ,गणपती ,भूमी ,शंख, घंटा पूजन करण्यात आले. त्यानंतर देवाची सोडोपचारे पूजा करण्यात आली .गंगेच्या शुद्ध जलाने देवाला अभंग स्नान घालण्यात आले .त्यामध्ये दहीळ, दूध ,तूप ,मध ,साखर ,लोणी, केशर पाणी घालण्यात आले. नंतर शंखाचा अभिषेक करण्यात आला .व नंतर देवाला अस्त्र,वस्त्र चढविण्यात आले .गंध हार फुले अर्पण करण्यात आली .नंतर देवाचे पाद्यपूजन करून देवाला आरसा धावण्यात आला. यजमानांच्या हस्ते देवाला नैवेद्य धूप दीप लावून देवाची महाआरती करण्यात आली. महापूजेच्या वेळेस मुख्य गाभाऱ्यात मंदिराचे मुख्य पुजारी कुलदीप कुलकर्णी व मंत्रपुष्पांजली अर्पित करण्यासाठी महेश महाराज पुजारी यांच्या मधुर वाणीतून देवाचा अभिषेक व महाआरती करण्यात आली .काकडा भजनासाठी नामदेव महाराजांचे सतरावे वंशज नामदास महाराज केदार व दोन सेवक उपस्थित होते .महापूजेच्या वेळेस श्री नारायणराव उदावंत श्री सुरेशराव कुलथे रुखमीनीबाई कुलथे दाम्पत्य व सेलू येथील उद्योजक दिनेश बोकन सत्यभामा बोकन ज्ञानेश्वर कुलथे ह भ प प्रेमानंद महाराज देशमुख माऊली वारकरी शिक्षण संस्था पांगरी फाटा ह भ प ज्ञानेश्वर महाराज झगरे वाकदकर रिसोड येथील अरुण शहाणे दांपत्य गोपाळ रायकर दांपत्य संतोष भाऊ प्रयागबाई आदी करून हजर होते .महापूजेच्या वेळेस देवाला फुलांची आरास करण्यात आली व गाभाऱ्यातील फुलांची सजावट व चंदनाचा सुगंध दरवळत होता. मंदिरावरील विद्युत रोषणाईंनी परिसर सजला होता . मंदिराच्या प्रांगणात सुंदर व आकर्षक रांगोळ्यांचा झगमगाट दिसुन येत होता. एकंदरीत मंदिराचा परिसर भक्तीरसांनी दुमदुमला होता. देवाचे रूप अधिकच चमकत होते . पांडुरंगाला धुप दिप नैवेद्य अर्पण करुन सकाळी ६ वा.पुजेच्या‌ विधीचा समारोप झाला.देवाचे हे मनमोहक रूप बघून भक्तगणांचा आनंद द्विगुणित झाला .आनंदी भावमुद्रेने देवाला यजमान साकडे घालत होते.हे विठुराया हे वर्ष सर्वांना सुख समृद्धी प्रदान करो,व सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे व देशावर कोणत्याही संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये असे पांडुरंगाला साकडे घातले.अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 2 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे