बरडशेवाळा बामणी येथील शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करत वाढदिवस केला साजरा

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.8
दिवसेंदिवस वाढदिवसावर खर्च करण्याची स्पर्धा लागली असुन एकीकडे अनाठायी खर्च केला जात आहे तर दुसरीकडे अनाठायी खर्चात बगल देत सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे.
ईरापुर ता.हदगांव येथील भुमिपुत्र मेडिकल असोसिएशनचे हदगांव तालुका अध्यक्ष विश्वासराव देशमुख यांचे सध्या हदगांव शहरात होम अम्पायेन्सस , बामणी फाटा, बरडशेवाळा येथे मेडिकल असुन आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना आपण आपले कर्तव्य पार पाडत समाजासाठी काही तरी देणे लागते या उदात्त हेतूने प्रेरित होउन आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हदगांव शहरात तामसा रोडवरील दुभार्जावर , डोंगरगाव येथील माता जगदंबा देवी मंदिर परिसरात, शहरातील मुकबधीर अंपग शाळा परीसरात वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना वहीशाळा पेन पेन्सिल व बिस्किटे वाटप केले.
तर बरडशेवाळा बामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल व बिस्किटे वाटप करीत वाढदिवस साजरा केला.
यावेळी राध्येशाम जाधव , डॉ.विलासराव तिवडे, डॉ.गंगासागर, निरंजन दहेकर, माजी अध्यक्ष भुतडा, अरुण पाटील उंचाडकर, बामणी उपसंरपंच अक्षय पवार,चेंडकापुर संरपंच थोटे, बाळु मोरे, शंकरराव भोसले, जगदीश बियाणी, दिनकर शिंदे,कवटीकवार, अमोल रायवार, सुर्यवंशी, जगदीश तावडे, बालासाहेब कांबळे, नारायण सुरोशे,मनोज चव्हाण, गौरव पंचलिंगे, परमेश्वर चौतमल,अनील देशमुख,जगन दुर्गे, नारायण ठाकुर, राजेश भोरे, संजय बोधने, डोंगरगाव बरडशेवाळा बामणी येथील गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.