pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शेतकऱ्यांनी राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज सादर करावेत

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी, दि.13

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 साठी मनुष्यबळ विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधुन दि.5 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जी.आर. कापसे यांनी केले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 साठी मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत राज्यात फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, मोठे प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखेल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वत:ची व त्याच बरोबर समुहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे या बाबीसाठी जिल्ह्यातील 25 शेतकऱ्यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार आहे.
राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्याकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षीत शेती, प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादीचा लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेवु इच्छित असलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याकडे संपर्क साधुन विहित नमुन्यातील अर्ज दि.5 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावे. लक्षांकाच्या मर्यादेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास विहीत पध्दतीने अर्जाची सोडत काढुन जेष्ठता सुचीनूसार अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल यांची नोंद सर्व शेतकरी अर्जदार यांनी घ्यावी. तसेच अर्ज करणारा लाभार्थी शक्यतो 18 ते 65 वर्ष वयोगटातील असावा. सदरील दौऱ्यांसाठी प्रति लाभार्थी ठरवुन दिलेल्या मापदंडानुसार जादा लागणारा खर्च लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतः करावा लागले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे