रायगड येथील वाघ्याच्या समाधी ला हात लावू नका – रवी देशमुख
धनगर समाजाचे नेते रवी देशमुख रायगड येथे करणार बेमुदत धरणे आंदोलन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
रायगड वरचा वाघ्या कुत्राचा पुतळा हटवा अशी मागणी छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.वाघ्या कुत्र्याचा पुतळा धनगर समाजाचा अस्मिता आहे.छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या मागणी मुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराजा तुकोजीराव होळकर यांनी छ.शिवाजी महाराजांचा इतिहास सगळीकडे पोहोचला पाहिजे म्हणून ४५०० प्रति घेऊन जगभरातील ग्रंथालयात पाठवल्या तसेच रायगडावरील पुतळ्यासाठी ५०००/- ची मदत केली होती. पु.आहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आहे नेमकी ३१ मे तारखेला.त्यांनी अल्टिमेट सुद्धा ३१ मे चा दिला आहे .त्यामुळे या मागणी मुळे धनगर समाजाला टार्गेट केले जात आहे.रायगड वरती वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला झेड प्लस(Z+ )दर्जा ची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने द्यावी.रायगड प्राधिकरण समितीतून छत्रपती युवराज संभाजीराजेंची हकालपट्टी करा. वाघ्या कुत्र्याची समाधीचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक विचारवंत इतिहास संशोधक यांची एक समिती तयार करा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या पायथ्याशी (रायगड किल्ला पायथ्याशी)३१ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा पत्रव्यवहारातून धनगर समाजाचे नेते रवी देशमुख यांनी महाड तहसीलदार यांना दिला आहे.