उरण येथे उडान महोत्सव जल्लोषात साजरा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय तसेच यूईएस महाविद्यालय, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केला जाणारा उडान महोत्सव यु इ एस महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला. विद्यापीठाच्या डी एल एल ई विभागाचे डायरेक्टर प्रा.डॉ. बळिराम एन.गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाचे डायरेक्टर डॉ. सुनील पाटील,डी.एल.एल.ई समन्वयक डॉ.कुणाल जाधव, ब्रह्मानंद प्रतिष्ठान च्या संस्थापक श्रीमती शिरीष पुजारी, कोकण ज्ञानपीठ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शृंगारपुरे, यु ई एस संस्थेचे अध्यक्ष तनसुख जैन, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, चंद्रकांत ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.किशोर शामा, प्राचार्या श्रीमती मीनाक्षी गुप्ता, उरण महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रमेशजी ठाकूर, क्षेत्रीय समन्वयक प्रा.डॉ. बी. एस.पाटील व प्रा. मनीष धायगुडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव समन्वयक प्रा.व्हि एस इंदुलकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सिद्ध करावी असे डॉ. बळीराम एन. गायकवाड यांनी प्रतिपादन केले. प्रमुख वक्त्या श्रीमती शिरीष पुजारी यांनी जीवन जगत असताना आपण इतरांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे असे सांगितले. या महोत्सवात एकूण नवी मुंबई परिसरातील २२ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला त्यात एकूण ४२० स्पर्धक विद्यार्थी, ५० स्वयंसेवक व ६० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. या महोत्सवात पथनाट्य, पोस्टर मेकिंग, क्रिएटिव्ह लेखन, वक्तृत्व व पोवाडा या विविध पाच स्पर्धांचे आयोजन केले गेले. या स्पर्धांमध्ये सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे सादरीकरण केले. आयोजक उरण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य स्पर्धा प्रथम, पोस्टर मेकिंग स्पर्धा प्रथम, पोवाडा स्पर्धा उत्तेजनार्थ व वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक, निर्माते प्रदीप गोगटे उपस्थित होते. त्यांनी कलाकारांमध्ये शिस्त व संयम महत्त्वाचा असून सातत्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यु इ एस संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली तर विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. डॉ. पराग कारुलकर,प्रा.कुमारी हन्नत शेख, श्रीमती रेश्मा बघेरा आदींनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही महाविद्यालयातील व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. उरण मधे पहिली वेळेस अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले गेले.