रायगड प्रकल्पग्रस्त आणि जनरल कामगार संघटनेने केला विक्रमी सलग चौथ्यांदा पगारवाढीचा यशस्वी करार.
अमेया लॉजिस्टिक कंपनीतील कामगांराना 7100 रुपये भरघोस वेतन वाढ.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23
कामगार क्षेत्रात रायगड प्रकल्पग्रस्त आणि जनरल कामगार संघटना ही संघटना गेली 14 वर्षा पासून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा कामगार नेते विनोद म्हात्रे व शिवसेना तालुका संघटक बी एन डाकी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमपणे कार्यरत आहे. संघटनेची आजपर्यंत वाटचाल ही उत्तम राहिलेली आहे. सदर संघटना कामगारांच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटत असून उरण तालुक्यातील खोपटा येथे अमेया लॉजिस्टिक कंपनीत 130 कामगार कार्यरत असून हे कामगार या संघटनेचे सक्रिय सभासद आहेत . सदर कामगार संघटनेची घोडदौड यशस्वीपणे सुरु असून अमेया लॉजिस्टिक कंपनीत लोकल लेबर यांचा सलग चौथ्यांदा विक्रमी असा 7100 रुपयेचा भरघोस वेतन करार नुकताच संपन्न झाला. सलग चौथ्यांदा विक्रमी पगारवाढ करणारी रायगड प्रकल्प आणि जनरल कामगार संघटना ही एकमेव कामगार संघटना आहे. 15 वर्षापासून अमेया लॉजिस्टिक कंपनी मध्ये सदर संघटना कार्यरत असून संघटनेचे संस्थापक विनोद म्हात्रे व बी एन डाकी यांच्या नेतृत्वामुळे तब्बल 7100 रुपयाचा वेतन वाढ कामगारांना मिळाले आहे.विनोद म्हात्रे तसेच बी. एन. डाकी यांच्या नेतृत्वामुळे कामगारांना नेहमी न्यायच मिळाला आहे. यंदाही लेबर कामगारांना 7100 पगार वाढ झाला.अमेया लॉजिस्टिक कंपनीत हा करार झाला असून यावेळी पर्ल फ्रेंड चे मॅनेजर विशाल पाटील, शरद सर, रायगड़ प्रकल्पग्रस्त आणि जनरल कामगार संघटनाचे संस्थापक विनोद म्हात्रे , जनरल सेक्रेटरी राजन पाटील यांच्यासह कामगार प्रतिनिधी – हरेश ठाकूर, सुरज मढवी, संतोष माळी, प्रवीण म्हात्रे, मनोज म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, हेमंत म्हात्रे, मिजेश म्हात्रे, प्रशांत केदारी, रविंद्र मोकल, अनिकेत गोंधळी, विनोद म्हात्रे व इतर कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक करार संपन्न झाला. अमेया लॉजिस्टिक कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ झाल्याने लेबर कामगारांनी कामगार नेते विनोद म्हात्रे, बी. एन. डाकी व संघटनेचे मनपूर्वक आभार मानले. फटाके फोडून व प्रत्येकाला पेढे वाटून कामगारांनी यावेळी आनंदोत्सव साजरा केला.