आंतरराष्ट्रीय युवा दिन सप्ताह साजरा

हिंगोली/प्रतिनिधी, दि.27
सेनगाव येथील तोष्णीवाल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दिनांक 26- 8 -2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिन सप्ताह साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने सुनिश्चित केलेला उपरोक्त दिवस हा जागरूकता दिवस म्हणून देखील ओळखला जातो. सांस्कृतिक व कायदेशीर समस्यांकडे लक्ष वेधने हे या दिनाचे औचित्य होय. वर्ष 2000 पासून शाश्वत मानवी विकास साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या तरुणांचा सहभाग वृद्धिंगत व्हावा यासाठी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एस जी तळणीकर तर प्रमुख वक्ते म्हणून किशोर वानखेडे (समुपदेशक ग्रामीण रुग्णालय सेनगाव )तरासे व कार्यक्रमाधिकारी डॉ आर नवगनकर ्प्रा ज्ञानेश्वर तडस प्रा जी पी भालेराव आदी मंडळी उपस्थित होती. प्रमुख वक्ते किशोर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांच्या आचरणावर भर दिला. समाजात वावरत असताना चांगल्या व वाईट गोष्टी पहावयास मिळतात .अशा प्रसंगी चांगल्याचा स्वीकार आणि वाईटास नकार या गोष्टी पाळल्या जाव्या. समाजाचे स्वास्थ सुयोग्य ठेवण्यासाठी पालकांची जबाबदारी आहे युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला.. प्राचार्य तळणीकर यांनी नैतिकतेचा स्तर उंचावण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे असे मत प्रतिपादित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजाभाऊ नवगणकर, सूत्रसंचलन प्रा संजय फड
व प्रा ज्ञानेश्वर तडस यांनी आभार प्रदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित होते