ब्रेकिंग
हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी
0
3
1
5
8
9
जालना/प्रतिनिधी,दि.29
हज यात्रा 2025 साठी जाणाऱ्या हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी दि. 5 मे, 2025 रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत बी.एस्सी. नर्सिंग विद्यालय जिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात येणार आहे. तरी हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरुंनी लसीकरण व आरोग्य तपासणी करीता येतांना त्यांचे आधार कार्ड व पासपोर्टची छायांकित प्रत व यात्रेकरुना काही आजार असल्यास त्याची औषधोपचाराची संपुर्ण कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
1
5
8
9