pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीमुळे नवीन शेवा ग्रामस्थांचा पुनर्वसनाच्या संदर्भात साखळी उपोषण मागे.

0 3 2 1 8 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.11

जेएनपीटी बंदरासाठी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवीन शेवा गाव हा बोकडविडा येथे स्थलांतरित करण्यात आला होता पण गेली ३७ वर्ष त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, पुनर्वसित नवीन शेवा गावाचा पुनर्वसन १९८७ साली बोकडविरा येथील सर्व्हे नं. ११२ मध्ये एकूण क्षेत्रफळ ३३.६४ हेक्टर जमिनीमध्ये झालेला असताना सिडकोकडून फक्त १० हेक्टर मध्ये नवीन शेवा गावाचा पुनर्वसन करण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित जागा सिडकोच्या ताब्यात असून ती जागा ग्रामस्थांना मिळावी म्हणून अनेकवेळा मोर्चा, आंदोलन, उपोषण केलेली आहेत.अनेक वेळा जे.एन.पी.टी., सिडको, जिल्हाधिकारी रायगड व तहसिलदार उरण यांच्याकडे वांरवार पत्रव्यवहार करूनसुध्दा आजपर्यंत जागेचा ताबा मिळालेला नाही, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विधानभवनामध्ये विनंती अर्ज समिती समोर हा विषय घेतला होता. त्याही वेळेस जमिनीचा ताबा देण्यात यावा असा विनंती अर्ज समितीच्या अध्यक्षानी आदेश पारित केले होते. तरी सुध्दा सिडकोने त्या आदेशाचा पालन केले नाही.

शेवटी नवीन शेवा ग्रामपंचायत च्या माध्यमातून ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी ग्रामस्थांना घेऊन आझाद मैदान, मुंबई येथे गेले तीन दिवस साखळी उपोषण करत होते व आपल्या मागण्यांचे चे निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना देऊन आणि चर्चा करण्यासाठी वेळ मागीतली होती, तरी बुधवार दिनांक १० जुलै २०२४ रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेसाठी बोलविण्यात आले, या वेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सोनल घरत, अध्यक्ष कमलाकर पाटील व शिष्टमंडळ जाऊन कॅबिनेट मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी सिडकोचे एमडी यांना फोन लावून याविषयी मिटिंग लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिडकोच्या एमडी यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोइर्र यांच्याशी सुद्धा सर्विस्तर चर्चा केली.चर्चा केल्यानंतर येत्या १२ जुलै २०२४ रोजी सिडको भवन येथे मीटिंग आयोजित करण्यात आले आहे.त्यामुळे नवीन सेवा ग्रामस्थांचा साखळी उपोषण तूर्तास मागे घेण्यात आला आहे.

यावेळी ग्रामसुधारणा मंडळाचे सल्लागार चंद्रकांत घरत,पंडित घरत, उपाध्यक्ष एल जी म्हात्रे, उपसरपंच रेखा म्हात्रे, महेश म्हात्रे, देवराम घरत, भूपेन्द्र पाटील, निलेश घरत, मंगेश घरत, अमित भोईर, निहाल घरत, मयूर म्हात्रे,अशोक दरने ,स्वराज ठाकूर, गणेश सुधाकर घरत, आतिश घरत, दर्शन घरत, रुपेश म्हात्रे, लहू पाटील, केतन पाटील, मितेश पाटील, मंगेश गोविंद घरत, विशाल घरत सागर घरत पीयूष घरत व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे