उरण विमला तलाव येथे जेएचके कथ्थक क्लासच्या सर्वप्रथम नृत्यारंभाचे स्नेहसंमेलन साजरे

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
कथक नृत्याचा नृत्य प्रवास म्हणजे “नृत्यारंभ ” असेच नृत्यारंभ उरण मध्ये साजरे झाले.उरण येथे विमला तलाव येथे जेएचके कथ्थक क्लासच्या सर्वप्रथम नृत्यारंभाचे स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. नृत्यारंभ म्हणजे हा प्रवास जेएचके कथक क्लासच्या विद्यार्थ्यांचा पहिल्या वर्षापासून ते चौथ्या वर्षापर्यंतच्या वर्धापन दिनाचा प्रवास सुंदर नृत्यातून सादर केला. “जेएचके” म्हणजे “जय हनुमान कला मंच” यांचे अनेक नृत्य वर्ग उरण मध्ये चालत आहेत. प्रत्येक वर्गाचे नाव वेगळ असले तरी संस्था हि एकच आहे.ज्याप्रमाणे जेएचके कथ्थक, जे एच के झुंबा, जे एचके किड्स असे अनेक वर्ग गेले कित्येक वर्ष उरण मध्ये विविध डान्स फॉर्म मध्ये शिकण्याचे काम करत आहेत.जे एचके कथ्थक व इतर वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक व गुरु हे रवींद्र वासुदेव म्हात्रे सर राहणार करंजा उरण हे या नृत्य कलेचे ज्ञानदानाचे कार्य गेली कित्येक वर्षे अविरतपणे करित आहेत.रवि सरांकडे १५० हुन अधिक नृत्य शिष्य नृत्यकला शिकत आहेत. यातील कथक वर्गामध्ये ३० पेक्षा अधिक नृत्य शिष्य आहेत. यामध्ये सर्वात छोट्या कथ्थक विद्यार्थीनींचे वय अवघे ४ वर्षे असून सर्वात मोठ्या विद्यार्थिनीचे वय ६२ वर्षे एवढे आहे.
जे एच के कथ्थक वर्ग हि अलिबागच्या अमोल कापसे सरांच्या नमन नृत्य संस्थेची एक शाखा आहे .जेएचके कथ्थक वर्गाचे विद्यार्थी कथ्थक पदविकेच्या परीक्षा नमन नृत्य संस्थेअंतर्गत देत असतात. यावर्षी पहिल्या वर्षाच्या परीक्षेमध्ये वैशाली सहतीया यांना डिस्टिंक्शन मिळाले असून इतर आठ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेमध्ये दोन विद्यार्थिनींना डिस्टिंक्शन मिळाले आहे. दूर्वा म्हात्रे आणि जोस्ना घरत तर इतर तीन विद्यार्थिनींनी ही परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे . तिसऱ्या वर्षाची परीक्षा ९ जणांनी उत्तीर्ण केली असून जान्हवी पाटील या विद्यार्थिनीला डिस्टिंक्शन मिळाले आहे. या विद्यार्थिनींना गुरुवर्य रवी सरांच्या शुभहस्ते वर्गाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच रवी सरांनी सन्मानित विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले.व त्यांचे अभिनंदन केले.
नृत्याच्या ‘नृत्यारंभ” या आगळ्यावेगळ्या स्नेहसंमेलनामध्ये कथ्थकच्या विद्यार्थिनींनी तीन ताल मधील काही बंदिशी सादर केल्या.यामधे ‘गतनिकास’ प्रकारा अंतर्गत” सीधे हात की गत”,”मटकी गत”, बासुरी गत चे सुंदर सादरीकरण केले. “भावपक्ष” अंतर्गत ३ नृत्यांचे अतिशय मनमोहक असे सादरीकरण केले. रवींद्र म्हात्रे सरांनी सुद्धा यावेळी कथ्थकचे अतिशय उत्तम सादरीकरण केले आणि सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या नृत्याच्या मैफिलीसाठी डॉ. हरिओम म्हात्रे, श्लोक पाटील, अभया म्हात्रे, अनंत घरत, केसरीनाथ पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ. दया परदेशी यांनी आपल्या सुंदर भाषाशैलीतून उत्तमरीत्या केले. या कार्यक्रमासाठी आर्थिक योगदान देण्याचे कार्य डॉ. सत्या ठाकरे ,डॉ.हरिओम म्हात्रे ,डॉ. संगीता डाके,केशरीनाथ पाटील व सर्व कथ्थक विद्यार्थिनींनी केले.
जे एचके चे कथ्थक वर्गाचे मार्गदर्शक रवींद्र सर व त्यांच्या सर्व विद्यार्थीनीं यांच्या सहकार्याने कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला. तसेच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सादर केलेल्या या नृत्याविष्काराने रसिकांना एक वेगळाच आनंद दिला याकरिता रसिकांनेही या नृत्य कलेसाठी टाळ्यांनी दाद दिली.