pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना जिल्ह्यातील संघटनात्मक बैठक खा.डॉ.भागवतजी कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

0 3 1 0 5 0

जालना/प्रतिनिधी,दि.15

जालना जिल्ह्यातील विधानसभा ची संघटनात्मक बैठक माजी केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा महाराष्ट्र बूथ रचना प्रमुख खा. डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय, जालना येथे आज दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाली.

यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भाजपा जालना महानगराध्यक्ष अशोक (आण्णा) पांगारकर, प्रदेश सदस्य राजेश राऊत, रामेश्वर पाटील भांदरगे, सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, देविदास कुचे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्याताई देठे, अर्जुन गेही, दिपक ठाकूर, गणेश बापू फुके, विजय कामड, धनंजय कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खा.डॉ.कराड म्हणाले की, देशाच्या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना व विकासाची मोठी गती वाढली आहे, भाजपा कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर बूथ संघटन मजबूत करा, आपले संघटन जर मजबूत असेल तर भाजपाला कोणीही हरवू शकत नाही. त्यामुळे भाजपा पदाधिकारी आणि बुथ प्रमुखांनी केंद्र व राज्य सरकारच्या जन कल्याणकारी योजना ग्रामीण भागातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करून संघटन मजबूत करावे त्यांनी बोलताना सांगितले.

यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे, म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना शहरी व ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम भाजपा पदाधिकाऱ्यांनी करून पक्ष संघटन वाढवून आगामी निवडणुका लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी बूथ सक्षमीकरणावर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भर द्यावा. सर्व बूथ प्रमुखांनी आपला व्हाट्सअपचा ग्रुपही तयार करावा. या माध्यमातून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होईल असे हि ते म्हणाले.

यावेळी जालना महानगराध्यक्ष अशोक (आण्णा) पांगारकर म्हणाले की, मेरा बूथ सबसे मजबूत या नुसार सर्वांनी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे. विविध योजनांची माहिती उपस्थित बूथ प्रमुखांना द्यावी. आपण जगातील नंबर एकच्या राजकीय पार्टीचे सदस्य असून आपली ही पार्टी नुसती राजकीय पार्टी नसून एक परिवार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून बूथ सक्षमीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे असे हि त्यांनी सांगितले.

यावेळी मुकेश चिने, विजय नाना परिहार, वसंतराव जगताप, भीमराव जावळे, बबनराव सिरसाठ, सुभाष बोडखे, कैलास उबाळे, सुप्पडसिंग जगरवाल, सुरेश दिवटे, सिद्धेश्वर हसबे, सुधाकर खरात, वसंतराव शिंदे, ज्ञानेश्वर भागिले, प्रदीप पवार, अनिल सरकटे, अभिजित अंभोरे, कृष्णा खिल्लारे, मुकेश चव्हाण, सोमेश काबलीये, दत्ता जाधव, बद्री वाघ, संतोष खंडेलवाल, सय्यद इम्रान, कृष्णा गायके, डोंगरसिंग साबळे, राजू साळवे, विनायक मामा पवार, नागेश अंभोरे आदींसह जालना, भोकरदन, बदनापूर विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे