राष्ट्रीय क्रीडा सप्ताहाचे जीवनराव पारे विद्यालयात उदघाटन संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.12
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत कार्यरत जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने क्रीडा सप्ताहाच्या कार्यक्रमांचे उद्घाटन गुरुवार दि.12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता चंदनझिरा येथील जीवनराव पारे विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे व प्रा. हेमंत वर्मा, क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, रेखा परदेशी उपस्थित होते. यावेळी क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम, आशिष जोगदंड, सुभाष पारे, माधव भद्रे आदींचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडा सप्ताह साजरा करण्यामागील शासनाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी खेळाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रशिक्षण केंद्रावर जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. नवीन पिढीने मोबाईलच्या गेममध्ये न खेळता मैदानी खेळ खेळावेत असा सुरही उमटला. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या कार्यावर प्रेरणादायी व्याख्यान प्रा. हेमंत वर्मा यांनी दिले. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पारे, माधव भद्रे, हरिचंद ढगे, अमरसिंह पावरा, राहूल गायके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खांडीभराड यांनी केले. तसेच शाळेतील विद्यार्थींनी कोमल सोनवणे, दुर्गा धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-