pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गोरगरिबांना तसेच आदिवासी बांधवांना त्यांच्या गरजेनुसार मदतीचा हात देणारे राजेंद्र भगत हे समाजाचे पाईक आहेत :- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे गौरउद्गार

0 3 2 5 6 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5

गोरगरिबांना तसेच आदिवासी बांधवांना त्यांच्या गरजेनुसार मदतीचा हात देणारे युवा नेतृत्व राजेंद्र भगत हे समाजाचे पाईक आहेत. असे गौरउद्गार काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी उरण विधानसभा युवक इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत यांच्या विषयी उरण मधील एका कार्यक्रम प्रसंगी भेटी दरम्यान काढले.

उरण विधानसभा युवक इंटेकचे अध्यक्ष राजेंद्र जगन्नाथ भगत यांनी एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत तर पॅरलेसचा झटका आलेल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या एका कुटुंबाला एक महिनाभर पुरतील एवढ्या जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांचे राजेंद्र भगत हे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांना आपले आदर्श मानून महेंद्र घरत यांनी करत असलेले सामाजिक कार्य लक्षात घेऊन, राजेंद्र भगतही आपल्या कुवतीनुसार सामाजिक भान ठेवून कार्य करीत आहेत. विशेषता: दरवर्षी राजेंद्र भगत हे गोरगरीब गरजूना मदत करतात. यामध्ये गरिबांना मांसाहारी जेवण, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्ष लागवड त्याचबरोबर आदिवासींच्या सुखदुःखात सहभाग तसेच त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करण्यात त्यांचा पुढाकार दिसून येत असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 5 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे