pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावेत

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 21

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या). जिल्हा कार्यालयामार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असुन या योजनेसाठी जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात दहावी, बाररावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी जिल्हा कार्यालय जालना येथे दि. 15 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यासाठी जास्त टक्केवारी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानूसार निवड मुख्यालय मुंबई यांच्याकडून उपलब्ध निधीच्या प्रमाणात केली जाते. या योजनेचा अर्ज भरत असताना अर्जासोबत अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतेलेला असावा), अर्जदाराच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांच्याकडून घेतलेला असावा), रेशन कार्ड, आधार कार्ड, झेरॉक्स प्रत. गुणपत्रक, दोन पासपोर्ट साईज फोटो. बोनाफाईट/पुढील वर्षात प्रेवश घेतल्याची पावती आदि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा कार्यालय जालना येथे दि. 15 जुलै 2023 पर्यंत सादर करावेत, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या)., जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2