pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सामाजिक न्याय समता पर्व अभियान; संविधान जनजागृती रॅली संपन्न

0 1 1 8 2 3

जालना/प्रतिनिधी,दि. 13

“ सामाजिक न्याय समता पर्व ” अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने दिनांक 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि.13 एप्रिल रोजी सहायक आयुक्त , समाज कल्याण, जालना कार्यालय येथून सकाळी 8 वाजता अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना येथील विद्यार्थीनीची “ संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीमध्ये निवासी शाळेतील विद्यार्थीनीनी महापुरुषांच्या विचारांवर आधारित घोषवाक्य व संविधानाबाबत घोषणा दिल्या. रॅली दरम्यान विद्यार्थीनींनी उत्साहपूर्ण व चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण केले. “ संविधान जनजागृती रॅली ” अंबड चौफुली मार्गे जावून नुतन वसाहत भाजी मंडई येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ “ संविधान जनजागृती रॅलीचा समारोप करण्यात आला. भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्री . अमित घवले , सहायक आयुक्त , समाज कल्याण , जालना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नुतन वसाहत येथील अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानामध्ये सहायक आयुक्त अमित घवले, कार्यालय अधिक्षक अतिश ससाणे, समाज कल्याण निरीक्षक गणेश अंबुरे, संतोष आढे, अमोल चाबुकस्वार, शंकर गोमलाडू, व मुख्याध्यापक डी.एम.गिरी व अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 3