pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आयुष्यमान भव: मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

0 1 7 4 0 6

जालना/प्रतिनिधी, दि.15

“आयुष्यमान भव:” या मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे राष्ट्रीयस्तरावरून राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते  माध्यमाद्वारे दुपारी 12 वाजता करण्यात आले. तसेच त्यानंतर राज्यस्तरीय कार्यारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भुसारे, निवासी वैद्यकिय अधिकारी जि.जालना डॉ. शितल सोनी, वैद्यकिय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र डॉ. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तसेच आरोग्य विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी उपस्थित होते.
‘आयुष्यमान भव:” ही मोहिम देशपातळीवरुन ग्राम पातळीपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त दि. 17 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.  या मोहिमे अंतर्गत दि. 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत सर्व आरोग्य संस्थास्तरावर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये Pationent Safety Week साजरा केला जात असून समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक (पुरुष) व आशा स्वयंसेविका यांनी गृहभेटी देवुन भेटी दरम्यान उपशामक सेवा (Palliative Care) आवश्यक असलेल्या रुग्णांना शोधून त्यांना उपशामक सेवा देण्यात येणार आहे तसेच Pationent Safety संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.
1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार असून अमृत ज्यामध्ये ग्राम पंचायत जनआरोग्य समिती व रुग्ण कल्याण समिती यांच्या सहाय्याने सर्व आरोग्य संस्थामध्ये स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविण्यात जाणार आहे. तसेच  या उपक्रमामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व आरोग्य संस्थामध्ये आयुष्यमान सभेमध्ये अवयवदानाची प्रतिज्ञा घेऊन अवयव दान करावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
मोहिमेच्या कालावधीमध्ये आयुष्यमान आपल्यादारी या मोहिमेअंतर्गत आयुष्यमान कार्ड मोहिम कार्ड नोंदणी व वितरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून जालना जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था क्षेत्रा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका यांच्यामार्फत तयार करावे व त्याप्रमाणे कार्ड तयार करावे. तसेच Self Ragistration साठी जनतेला प्रोत्साहीत करून परोपरी E-KYC चे वाटप करावे तसेच सदर यादी आरोग्य केंद्रावर तसेच गावांतील महत्वाच्या ठिकाणी लावण्यात यावी. तसेच लाभार्थ्याची नोंदणी PM-JAY Portal वर करण्यात यावी व आयुष्यमान कार्ड जनरेट करण्यात यावे अशा सूचना या दरम्यान  जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
दि. 17 सप्टेंबर पासुन दि.31 डिसेंबर 2023 या कालावधीत आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पहिल्या आठवडयात असंसर्गजन्य आजारी, निदान, उपचार आणि संदर्भसेवा दुस-या आठवड्यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार तपासणी, निदान, उपचार आणि संदर्भसेवा व तिस-या आठवडयामध्ये माता बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा या बाबत तर चौथा आठवडयात नेत्ररोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी तसेच सिकलसेल तपासणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या करिता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यास्तरावरुन वैद्यकिय महाविदयालय यांच्या समन्वयाने उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये स्तरावर दर आठवड्याला आरोग्य मेळावा आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जनतेने मोठया संख्येने सदर आरोग्य मेळाव्यामध्ये सेवा घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,  असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी उपकेंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत गावपातळीवर आयुष्यमान सभेचे आयोजन करण्यात यावे. तसेच सदर सभेमध्ये गावातील सरपंच, ग्राम सदस्य, ग्रामसेवकातील मान्यवर मंडळी यांचा समावेश करण्यात यावा. या सभेमध्ये आयुष्यमान कार्ड वितरीत करणे हा मुख्य उद्देश असून 100 टक्के आयुष्यमान कार्ड वितरण व आभा आदी नोंदणी करणे हा आहे. तसेच या सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी व त्या लाभाय्याने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांची यादी प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत असलेल्या रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करने व जनतेला याबाबत अवगत करणे हा आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना यादीमध्ये नांव असलेले बाबतची खातरजमा होईल. तसेच यापूर्वी या लाभाष्य आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभाल्यांना मिळालेल्या आरोग्य सुविधेवात सेवा मनोगत व्यक्त करण्यास सांगावे तसेच जर कोणी 78 Champion गावांमध्ये असल्यास त्याचा गौरव करण्यात येवुन त्याला देखील मनोगत व्यक्त करण्यास सांगावे व लाभार्थ्यांच्या अनुमतीने व्हिडीओ काढून त्याची प्रसिद्धी करावी तसेच सदर सभेमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांनी असंसर्गजन्य आजाराची माहिती जसेकी High Risk factor योग्य आहार विहार Physical Activity, मानसिक आरोग्य क्षयरोग व सिकलसेल या संदर्भात Health Talk आयोजित करण्यात यावे. तसेच प्रतिबंधात्म उपाय योजनावर भर देण्यात यावा, त्याकरिता आरोग्य विभागामार्फत देण्यात येणा-या आरोग्य सेवा सुविधा जसे आभा आयडी कार्ड, आयुष्यमान कार्ड, लसीकरण व त्याचे फायदे क्षयरोग, कुष्ठरोग, असंसर्गजन्य व संसर्गजन्य रोग, संजीवणी ई ओपीडी, टेलिकन्सलटेशन टेलीमानस इत्यादी योजनांची माहिती देवून जनजागृती करण्यात बाबी अशा सुचना मा जिल्हाधिकारी यांनी आरोग्य कर्मचारी यांना दिल्या असून सदर कालावधीमध्ये जास्तीत जास्त रुग्णाती आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. त्यानंतर आरबीएसके पथकामार्फत अंगणवाडी व प्राथमिक शाळेमध्ये 18 वर्ष वयोगटातील मुला- मुलींचे तपासणी गुणवत्ता पूर्वक करण्यात येणार असून आवश्यकता असल्यास जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रिया करण्याकरिता संदर्भित करण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या तसेच आवश्यकतेनुसार लाभार्थ्यांना सहाय्य उपकरणे उपलब्ध करून देण्यात याला जसे (उदा. चष्मा यंत्र व्हिलचेअर) आदि सेवा उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात येईल. असे सांगितले या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे