एक दिवसीय सायबर जागरुकता कार्यशाळा; आज जालना येथील कार्यालयांसाठी कार्यशाळा
जालना/प्रतिनिधी,दि.10
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, सर्व उपविभागीय कार्यालये तसेच शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सायबर जनजागृतीसाठी एक दिवसीय सायबर जागरुकता कार्यशाळेचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले.
“टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट” या थीम अंतर्गत जिल्ह्यात सेफ इंटरनेट डे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशभर विविध स्तरावर सायबर जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इन्फॉर्मेशन सेक्युर्टी एज्युकेशन अवेरनेस यांच्या (https://isea.gov.in) या संकेतस्थळावर सायबर जागृती, सायबर सुरक्षा, सायबर स्वच्छता आदि मुद्यांवर जागरुकतेसंदर्भात सर्व माहिती उपलब्ध आहे. या माहितीचा उपयोग करून आपल्या कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन आपल्या स्तरावर करावे. तसेच या कामी काही अडचण असल्यास जालना येथील जिल्हा सूचना केंद्राचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जालना येथील कार्यालयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात दि. 11 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता सायबर जागरूकता कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालयामधील सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे. अशा सुचनाही देण्यात आलेल्या आहेत.
सर्व विभागांनी आपापल्यास्तरावर या कार्यशाळचे आयोजन करुन सहभाग घ्यावा आणि या उपक्रमातून मिळणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनाचा योग्य लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या मार्फत देण्यात येणाऱ्या ई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता राखण्यास मदत होईल. तसेच आपल्या विभागात, कार्यालयात कार्यशाळा आयोजन केल्याबाबतचे छायाचित्र व्हिडीओसह जिल्हा सुचना विज्ञान केंद्र कार्यालयाच्या ई-मेल mahjal@nic.in वर सादर करावेत. असेही कळविले आहे.