छ.संभाजीनगर येथे आनंद बहुउद्देशिय संस्था तर्फे भगवान बुद्ध यांची जयंती उत्सव साजरी

छत्रपती संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.5
आनंद बहुउद्देशीय संस्था तर्फे भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्त आनंद बहुउद्देशिय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दगडू भामरे यांनी सिद्धार्थ गार्डन येथे भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण शिरसाट शहर जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती हे होते. त्याप्रसंगी शिरीष चव्हाण, सॅमसन हिवाळे, दादाराव बोर्डे, कडुबा राऊत, विशाल लांडगे, प्रदीप केदारे, करण कालियांना, अनिताताई भंडारी, रेखाताई राऊत, रोहन थोरात, अमोल दाभाडे, हरचारणासिंग गुलाटी, प्रा. शिलवंत गोपनारायण, राजूभाऊ प्रधान, उमाकांत खोतकर, योगेश थोरात, सुनील साळवे, किसनराव साळवे, रवी लोखंडे, मंजुताई लोखंडे, यादवराव अहिरे आदी उपस्थित होते.