जालना/प्रतिनिधी,दि.12
आयुष्यातील आव्हाने पेलायची असतील तर मनातील
न्युनगंड टाळता आला पाहिजे. शिक्षक आणि पालकांनी मुलांच्या पंखात बळ
देण्यासाठी कृतीशील सुसंस्काराची बीजे पेरली पाहिजे,असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी संस्कार प्रबोधिनी विद्यालयात आयोजित
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलताना केले.
संस्कार प्रबोधिनी विद्यालयात बुधवारी १२ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमास
जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुरेश केसापुरकर,सचिव
विजय देशमुख, विनायक देशपांडे, भास्करराव काळे,डॉ.जुगलकिशोरभाले,
एस.एम.देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी अनिकेत मोताळे
याच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले,की
विद्यार्थ्यानी स्वप्न बघावे,ते बघताना मात्र पुस्तकांची संगत ठेवली तर
यशाचा मार्ग सापडतो, असेही डॉ.राठोड यांनी सांगितले. जीवनातील भूमिका
समजून घेत वाटचाल केली पाहिजे. विद्यार्थी ही भूमिका असेल तर अभ्यासात
प्रामाणिकपणा असायलाच पाहिजे. यशाच्यामागे आईवडील,शिक्षकांचा वाटा
असतो,परंतु प्रत्येकाने परिश्रम करण्याची तयारी ठेवायला पाहिजे,असेही
जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुरेश केसापूरकर यांनी संस्थेतर्फे
राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.गुणवंत विद्यार्थ्यासह
शिष्यवृत्ती, प्रगत अभियान,क्षेत्रभेट सारखे उपक्रम कशाप्रकारे
राबविण्यात येतात याची माहिती उपस्थित पालकांना दिली.
कार्यक्रमात इयत्ता पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत
श्रावणी राऊत,वेदिका देशपांडे, जय बारगजे, स्वानंद गोंदीकर,गौरी राऊत,
सार्थक बिराजदार,सार्थक पुराणिक,मिताली वाघ,संपदा देशपांडे, श्रेयस
लंके,चंचल कुलवंत,शताक्षी कडाळे, अंजली नाटकर,सुंदर शिंदे, ओमकार
जगताप,प्रथमेश गोरडे,संकेत राठी, आठवी शिष्यवृत्ती अनिकेत
मोताळे,श्रीहरी उत्तरवार, यश इंगळे,अभिषेक खंडेकर,यशवंत बारगजे,श्रावणी
शिंदे, अक्षय दळे,अस्मिता चौधरी,रोहन बकान,पार्थ निलावार,श्रीकृष्ण
चापलवार, प्रणव साने,अनुष्का फुके,समृध्दी भडागे, सुनयना साबळे, दर्शना
कापसे,ओकार इगळे, प्रथमेश मोठे,ज्ञानेश्वरी शिंदे, अभिषेक गवारे या
विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका रीमा पोळ, मुख्याध्यापक ईश्वर वाघ यांच्यासह
पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अस्मिता
चौधरी,श्रावणी शिंदे या दोघींनी केले.