श्री जागृत हनुमान मंदिर बोकडविरा येथे प्राणप्रतिष्ठापणा व जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट उरण तर्फे श्री जागृत हनुमान मंदिर बोकडविरा द्रोणागिरी रेल्वे स्टेशनच्या समोर द्रोणागिरी येथे भव्यदिव्य असे हनुमान मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार सोहळा श्री हनुमान जन्मोत्सव दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा, शोभा यात्रा, प्रसाद वाटप, दिनांक १२/४/२०२५ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, मुख्य देवता पूजन कळस पूजन, भजन, होम हवन क्षेत्रपाल पूजन, प्राणप्रतिष्ठा पूर्णहुती, सुंदर कांड,श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ बोकडवीरा यांचे सुश्राव्य असे भजन,महाप्रसाद आदी विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला, या सोहळ्याला सुभाष राठोड, बिकी शेठ, ललित सिंह, राजकुमार, रिक्षा चालक मालक संघटना बोकडविरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटीचे मुख्य संरक्षण करण हरिश्चंद्र पाटील,उत्सव समिति का पि.टी.चव्हाण,दिनेश जयस्वाल, रंजन कुमार, कामेश्वर शर्मा,रुपेश पाटील, धनंजय शिंदे, आनंद कोपे, मनोज शर्मा,दीपक मिश्रा,रवींद्र पाटील,अंकुश चव्हाण,राम चौहान,पुजारी प्रदीपजी महाराज आदींनी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमाला माजी आमदार मनोहर शेठ भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे,बोकडविरा ग्रामपंचायतचे सरपंच पाटील अपर्णा पाटील,मनोज पाटील आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री हनुमान देवतेचे दर्शन घेतले. एकंदरीत बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट उरण तर्फे बोकडविरा द्रोणागिरी रेल्वे स्टेशन येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.