pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आयटीआयमध्ये इन्क्युबेशन सेंटर उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देवून केली जागेची पाहणी

0 1 2 1 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 26 

मराठवाड्यासह संपूर्ण जालना जिल्ह्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत देशातील पहिले इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने आज मंगळवार दि.26 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसह जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरात प्रत्यक्ष भेट देवून इन्क्युबेशन सेंटर उभारणीसाठीच्या जागेची पाहणी केली.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यंवंशी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त भुजंग रिठे, प्राचार्य प्रविण उखळीकर, उद्योजक सुनिल रायठठ्ठा, रितेश मिश्री, आशिष गर्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योग व्यावसायाशी संबंधित नवसंकल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि या नवसंकल्पनांना मुर्त रुप देण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरची गरज भासत असते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी कार्यशाळेत प्रवेश करुन तेथील विविध व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची मनमोकळा संवाद साधला. तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गट निर्देशक, शिल्प निर्देशक, कर्मचारी आदि उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2