pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वडीलांचे छत्र हरवलेल्या दुर्गाच्या लग्नासाठी रयत प्रतिष्ठानसह दानशूर सरसावले विवाहासाठी लागणारी केली मदत

0 1 7 8 9 8

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.2

चिंचगव्हान गावालगत आदीवासी भागात असलेल्या खामगव्हाण ता.हदगांव येथील वडिलांचे छत्र हरवलेली दूर्गा अंसाजी वाकोडे आई मोल मजुरी करून उदरनिर्वाह चालवते. दुर्गा लहान भाऊ आईसह आपण कल्पनाही करु शकत नाही अश्या कुडाण पत्राच्या घरात अतीशय हलाकीच्या परिस्थितीचा सामना करीत राहते.
दुर्गाचा गावालगत माळझरा येथील मुलाशी विवाह जुळला. विवाह एक मे रोजी ठरला.विवाह म्हटल्यावर सध्याची वाढत्या महागाईतील सर्व सामान्याला न परवडणारा खर्च त्यात आठरा विश्व दारिद्रय अश्या परिस्थितीत विवाह तोंडावर आल्याने आई वनीताबाईंना लग्नाची काळजी लागली . चिंचगव्हाण येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी घडबळे यांनी ही माहीती रयत सेवाभावी प्रतिष्ठानला दिल्याने रयत प्रतिष्ठान ने विवाहाच्या एक दिवस अगोदर मंगळवार 30 एप्रील रोजी खामगव्हाण येथे जाऊन सर्व संसार उपयोगी साहित्य सुफूर्त केले .साऱ्या वस्तु पाहुण दुर्गा व आई वनीताबाईच्या डोळ्यातुन आनंद आश्रु दिसुन आले.
तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक बेग मुख्याध्यापक अलप्पा देवकर , मुख्याध्यापक संतोष कांबळे पळसेकर उमरखेड येथील सुप्रसिद्ध डाॅ.गजानन येलुरे यांच्यासह दानशूर बांधवानी मदत करीत सामाजिक बांधीलकी जोपासली.
यावेळी रयत प्रतिष्ठान अध्यक्ष सटवा पवार, सामाजिक कार्यकर्ते राजु पांडे हदगांवकर,सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे, भगवान कदम वाळकीकर ,बालाजी घडाबळे,बंडु माटाळकर निवघाबाजार,रामेश्वर बोरकर निवघाबाजार,प्रभाकर दहीभाते बरडशेवाळा हुंबे यांच्यासह लग्नाला जमलेली नातेवाईक मंडळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 8 9 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे