नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश जारी

जालना/प्रतिनिधी,दि. 1
सर्व आस्थापना मालकांनी त्यांच्याकडील अंबड, भोकरदन, परतूर नगरपरिषद निवडणूक होणाऱ्या क्षेत्रात मतदार असलेल्या कामगारांना दि. 2 डिसेंबर, 2025 रोजी कामगार, अधिकारी – कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सुट्टी महत्वाची आहे. तरी महाराष्ट्र शासन परिपत्रकातील आदेशानुसार जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर नगरपरिषद निवडणूक क्षेत्रातील कामगारांना दि.2 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ.मा. जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यातील अंबड, भोकरदन, परतूर नगरपरिषद निवडणूक दि. 2 डिसेंबर, 2025 रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान करण्यासाठी सदरहू दिवशी सुट्टी सर्व निवडणूक क्षेत्रातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्ये गृह, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) या मधील कामगारांना दि. 2 डिसेंबर, 2025 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करावी. तसेच निवडणूक होणाऱ्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) येथे मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत. अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधित मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या दृष्टीने मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टीची विशेष सवलत देण्यात यावी म्हणून महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण 2025./प्र.क्र.200/कामगार-9 मंत्रालय, मुंबई-32 दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे आदेशीत केलेले आहे. जालना जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थाना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्ये गृह, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल, याची काटेकारपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडुन मतदानाकरिता योग्य ती सुट्टी प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल. याबाबतीत उदभवणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी, जालना यांच्या कार्यालयामध्ये दक्षता कक्ष स्थापना करण्यात आलेला आहे. तरी संबंधित कामगार, कामगार संघटनांनी दुरध्वनी क्र. 02482-2030296 यावर संपर्क साधावा किंवा govtlabour.officer५२@gmail.com या ई-मेल आयडी वर तक्रार करावी. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

