ब्रेकिंग
आंतरराष्ट्रीय कामगार नेते, महेंद्रशेठ घरत यांनी संघटना पदाधिकारी व सहकार्याना घडविली लंडन वारी!

0
3
1
2
8
3
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.11
आय टी एफ लंडन या बहुराष्ट्रीय कामगार संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह बोर्ड कमिटीची लंडन येथे ९ ते ११ एप्रिल रोजी बैठक सुरू असून एक्झिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीत उपस्थित आहेत . लंडन येथे आय टी एफ चे मुख्य कार्यालय असून कार्यालयाचे कामकाज कशाप्रकारे चालते त्याचबरोबर जागतिक पातळीवर कामगार हिताचे निर्णय याच बैठकीत पारित होत असतात . एक्झिक्युटिव बोर्ड मेंबर म्हणून असणारे महेंद्रशेठ घरत यांनी आपल्या कामगार संघटनेचे पदाधिकारी व सहकार्यांना आयटीएफ लंडनचे मुख्यालय व तिथे चालणारे कामकाज हे पाहण्याकरता स्वखर्चाने सर्वांना लंडन वारी घडविली.
0
3
1
2
8
3