मानवतेच्या कल्याणासाठी मिशन बॉस मानव अधिकार युवा फॉउंडेशन मध्ये सहभागी होण्याचे मोहसीन शेख यांचे आवाहन.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
“जात-पात धर्म इन सबसे उठकर एक आवाज़ हम है भारतीय और हम सभी है इस देश के बॉस”
हे विचार आणि शब्द आहेत मोहसिन शेख यांचे.मिशन बॉस मानव अधिकार युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मोहसीन शेख हे उरणचे भूमीपुत्र असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.मोहसिन शेख हे कोणत्याही गोष्टीचे स्वार्थ न बाळगता, प्रसिद्धीच्या पाठीमागे न धावता अविरत समाजसेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. मोहसिन शेख यांचा असे म्हणणे आहे की जेव्हा जेव्हा भारतामध्ये इलेक्शन येतात तेव्हा सर्व पक्षाचे नेते मिनिस्टर सर्वजण जनतेचे पाया पडतात. आणि नतमस्तक होऊन जनतेला सांगतात की आम्हाला निवडून द्या.त्याचा अर्थ असा की जनता ही मायबाप हीच बॉस आहे.हे दरवर्षी इलेक्शन मध्ये प्रत्येकाला अनुभवाला आलाच असेल.कुठल्याही संविधानिक पदावर शासकीय पदावर बसलेला व्यक्ती हा जनतेचा सेवक आहे. आणि भारताचा प्रत्येक नागरिक प्रत्येक जण त्यांचा बॉस आहे.देशामध्ये प्रत्येक नागरिकांमध्ये अशी जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहसिन शेख यांनी बुलंद आवाज से कहो हम भारतीय है,इस देश के बॉस है अशी घोषणा केली आहे . भारतातील तुलनेत इतर देशांमध्ये झपाट्याने प्रगती झालेले देश त्यांचे जनतेचा सर्वप्रथम आदर सन्मान करतात.सर्व प्रथम आदर व बाकीचे नंतर असे कर्तव्य बजावताना इतर देश दिसत आहेत.जपान रशिया ब्रिटन दुबई हे जेवढे प्रगतिशील देश आहेत त्यांनी आपले नागरिकांची व्हॅल्यू आपली नागरिकांची रिस्पेक्ट जगाला दाखवून दिली आहे . तिथली जनता सुखाने आनंदाने जगत आहेत. तिथली सरकार मध्ये बसणाऱ्या नेत्यांनी तेथील लोकांची,आपले जनतेची साथ जनतेच्या हित समजून घेतली आहे.त्यामुळे त्या देशाची प्रगती चालू आहे. प्रगती मुळे त्यांची कदर व्हॅल्यू केली जाते. हे जगाकडे पाहून मोहसिन शेख यांचे विचार हेच म्हणतात की लोकशाहीत नागरिक हे महत्वाचे असतात.भारताची जनता बॉसची भूमिकेत असले पाहिजे.मोहसीन शेख यांच्या संघटनेचे नाव आहे “मिशन बॉस मानव अधिकार युवा फाउंडेशन” या संघटनेत मानवतेच्या कल्याणासाठी, माणसाचे हक्क, कर्तव्य, अधिकार,जाणीव अबाधित ठेवण्यासाठी जास्तीत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मोहसीन शेख यांनी केले आहे.सामाजिक कार्य करणाऱ्या इच्छुक नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी फाउंडेशन मध्ये शामिल व्हा.संपर्क करा. ९५९४७८६३३२ या मोबाईल नंबर वर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.