pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरणच्या जय हनुमान कला मंचने नृत्याविष्कारात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून देशपातळीवर जिंकली दीड लाख लोकांची मने.

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय नृत्याविष्कारात सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून आंध्र प्रदेश येथे देशपातळीवर झालेल्या तिरुपती बालाजी मंदिरामध्ये महाराष्ट्र राज्याची संस्कृती जपणारे कोळी नृत्य आणि वाघ्या मुरली या नृत्याविष्काराने उपस्थित दीड लाख प्रेक्षकांची मने जिंकत तब्बल सहा वेळा परफॉर्मन्स करून उरण चा झेंडा अटकेपार पोहोचवणारा मिलिंद म्हात्रे दिग्दर्शित जय हनुमान कलामंच पथकाला महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करून देशभरात उरणचे नाव आबादीत ठेवणाऱ्या जय हनुमान कला मंचचे सर्वत्र कौतुक होत आहे. उरण मधील अगदी खेडेगावातील करंजा कोंढरीपाडा येथील हे नृत्य पथक देशपातळीवर आपला नृत्याविष्कार सादर केला त्यामुळे ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.दिनांक १५ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तिरुपती बालाजी देवस्थान मंदिरात श्रीवारी नवरात्री ब्रह्मोस्तवात देशातील विविध राज्यातून आलेल्या नृत्यपथकांनी त्या त्या राज्यातील नृत्याविष्कार सादर केले. परंतु या ब्रह्मोस्तवात खास आकर्षण ठरले ते महाराष्ट्र राज्याचे वैशिष्ट्यपूर्ण कोळी नृत्य व वाघ्या मुरली नृत्य देशातील सर्वच राज्यातील नृत्यपथकांनी आपापली नृत्याविष्कार रॅलीमध्ये सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला आंध्र प्रदेश राज्याचे मान. मुख्यमंत्री वाय.एस. जगमोहन रेड्डी ,श्रीम. सुमनजी अय्यर मॅडम, श्रीम. पोर्णिमा राय मॅडम व अन्य पदाधिकारी, अधिकारी, बालाजी देवस्थानचे सर्व विश्वस्त, सर्व राज्यांचे नृत्य पथके व अन्य मान्यवर उपस्थित होते. या नृत्यपथकात १३ कलाकार सहभागी झाले होते.त्यामध्ये नृत्यदिग्दर्शक मिलिंद म्हात्रे, शुभम होळकर, विशाल म्हात्रे, यश चव्हाण, तनिष्क बंदरे, दर्पण ठाकूर, प्रणित पांचाळ, दीप चव्हाण, वरद थळी, निशीता ठाकूर, तन्वी कोळी, ममता म्हात्रे व खुशी पाटील हे कलाकार सहभागी झाले होते.जय हनुमान कला मंच उरण या कलापथकाला विशेष सहकार्य करणारे व शुभेच्छा देणारे उरण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश निकम, द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी(माध्य.)मुख्याध्यापिका श्रीम.प्रभू मॅडम, वीर वाजेकर महाविद्यालय
फुंडे मुख्याध्यापक एम. एम म्हात्रे सर, या नृत्यपथकाचे मार्गदर्शक संजय होळकर, सर्व ग्रामस्थ, पालक, यांनी विशेष मेहनत घेऊन या पथकाला देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल या कलामंचाचे सर्वेसर्वा मिलिंद म्हात्रे यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत. आजतागायत या नृत्य पथकाने महाराष्ट्र,गोवा ,गुजरात व आता आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आपली कला सादर केली असून विविध टीव्ही वाहिन्यांवर देखील सहभागी होऊन आपली कला सादर केल्याबद्दल संपूर्ण राज्यातून या कलामंचाचे भरभरून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे