व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या जाफ्राबाद तालुकाध्यक्षपदी विशाल वाकडे यांची निवड
कार्याध्यक्ष शेख अजीम तर उपाध्यक्ष भरत लहाने,अशोक पाबळे ...

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.8
व्हॉईस ऑफ मीडिया जालना जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष व कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस यांची नियुक्ती जालना जिल्हा अध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
त्यात जाफ्राबाद तालुकाध्यक्षपदी विशाल पाटील वाकडे,कार्याध्यक्ष शेख अजीम,उपाध्यक्ष भरत लहाने,अशोक पाबळे टेंभुर्णी,सरचिटणीस भास्कर जाधव,सहसरचिटणीस अनिल जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सर्वच कार्यकरणीचे तालुका भरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सकारात्मक पत्रकारिता हे सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहे, त्या पत्रकारितेच्या माध्यमातून नक्कीच समाजाचे कल्याण होते, हा विचार आपोआपच लोकांमध्ये रुजेल. आपल्या उद्देशाची पूर्तता त्या ठिकाणी होईल. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पत्रकारिता शाबूत राहावी, पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहावा,
पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा फायदा व्हावा, ही आपल्या पत्रकारितेची विचारधारा आहे, मार्गदर्शक तत्त्व आहे.
असे व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी सांगितले आहे …