आदर्श विद्यालय सायगाव डोंगरगाव विद्यालयाचा १० वी परिक्षेचा निकाल 89.88%
काजळा/प्रतिनिधी, दि.27
बदनापूर तालुक्यातील सायगाव डोंगरगाव येथील आदर्श विद्यालयाचा एस.एस.सी.चा निकाल 89.88% इतका लागला आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 25 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण, प्रथम श्रेणीत 33 विद्यार्थी उत्तीर्ण, द्वितीय श्रेणीत 16 विद्यार्थी उत्तीर्ण तृतीय श्रेणीत 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातून कु. सोनल विनायक धायडे हिने 89% प्रथम, द्वितीय क्रमांकामध्ये सुरज बाबु जमधडे 87%, तृतीय क्रमांक कु. किरण सतिश इंगळे 86% प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री. नाथाभाऊ घनघाव अध्यक्ष, दामोधर ठोंबरे सचिव, सर्व संचालक मंडळ श्रीयुत अरविंदराव चव्हाण, भाऊसाहेब वाढेकर, योगेश शिंदे, साईनाथ घनघाव, ज्ञानदेव घनघाव, गोपाल महाजन, संजय शिंदे, अविनाश घनघाव, हरिचंद्र कापसे, प्रकाश गवारे, श्रीमती विद्या शिंदे, श्री. सुभाष भालेराव, गटशिक्षणाधिकारी बदनापूर श्री. आन्नासाहेब खिल्लारे केंद्रप्रमुख काजळा, श्री. राजेश जोशी केंद्रीय मुख्याध्यापक काजळा, श्री. पंढरीनाथ उनवणे मुख्याध्यापक, रमेश रबडे परिक्षा विभाग प्रमुख, श्री. एकनाथ तांबे, श्रीमती कविता अहिरराव, श्रीमती रंजना हिवरे, रामकृष्ण पाटील, गोविंद पडूळ, बाबासाहेब पाझडे, दिनकर लाड, विजय घनघाव, आबासाहेब सुपेकर, राजेभाऊ मगर, आसाराम कईलकर, अशोक मुगदल, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.