pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मॅट्रीकोत्तर अर्ज महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

0 3 8 3 5 3

जालना/प्रतिनिधी,दि. 4

महाडीबीटी पोर्टलवरील अनु. जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन सादर करण्याची सवलत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.सन 2023-24  व 2024-25  वर्षातील ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थी लॉगिनला परत पाठवण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना री अप्लाय करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2025 देण्यात आलेली आहे.तसेच सन 2025-26 वर्षामधील अनु. जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदत्रे स्कॅन करुन अर्ज नोंदविण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महाविद्यालयांत कॅम्प आयोजित करुन जास्तीचे कर्मचारी यांची नियुक्ती करुन जास्तीत जास्त अर्ज नोंदणी होण्यासाठी कार्यवाही करावी.सन 2025-26 वर्षासाठी दिनांक 1 जुलै 2025 ते 31 ऑगस्ट हि मुदत देण्यात आलेली असुन वरीलप्रमाणे कार्यवाही न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थी व प्राचार्य यांची, राहील, याची नोंद घ्यावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे