इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत
जालना/प्रतिनिधी,दि. 21
शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी क्युएस-200 च्या आतील असलेल्या संस्थेत चालु वर्षात प्रवेश घेतला आहे. अशा 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येत असते. तरी संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन आवश्यक कागदपत्रासह दि.17 मे 2025 पर्यंत समक्ष अथवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, दुसरा मजला, म्हाडा कमर्शियल कॉम्पलेक्स, येरवडा, पुणे 411006 येथे दोन प्रतीत सादर करावा, असे आवाहन सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.