pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे थाटात उदघाटन विचारांची दिशा नेहमीच सकारात्मक ठेवा – अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.23

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने जालना शहरात आयोजित 14 वर्षा खालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या हस्ते आज संपन्न झाले. खेळाडूंनी नेहमीच आपल्या विचारांची दिशा सकारात्मक ठेवावी. सकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात प्रगती होत असते व आपण आपले इच्छित ध्येय साध्य करु  शकतो, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी श्रीमती मेत्रेवार यांनी करुन उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक, पंच, आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. चंद्रजित जाधव, (सहसचिव भारतीय खो-खो महासंघ), प्रा. जे. पी. शेळके (शिव छत्रपती पुरस्कार विजेते तथा खो खो असोसिएशन चे माजी सचिव),ॲड. गोविंद शर्मा (सरचिटणीस खोखो असोसिएशन महाराष्ट्र), जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सुहासिनी देशमुख (जिल्हा क्रीडा अधिकारी बीड ), प्राचार्या डॉ. भागवत कटारे (उपाध्यक्ष जिल्हा खो-खो असोसिएशन ), डॉ. रफिक शेख ( सचिव जिल्हा खो खो असोसिएशन), दीपक सपकाळ ( तांत्रिक समिती प्रमुख ), निवड समिती सदस्य प्रशांत पवार,  मनीषा मानकर, विकास सुर्यवंशी, क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी दीपक जगदाळे, शेख चाँद पी.जे. (जिल्हा क्रीडा संघटक तथा सचिव जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन), प्रमोद खरात (क्रीडा प्रबोधिनी प्रमुख), प्रियंका येळे (शिव छत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू), प्रकाश कुंडलकर (मुख्याध्यापक जि. प. प्रशाला मुलांची जालना), प्रा.डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, क्रीडा संघटक विजय गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्तावीक श्री. विद्यागर यांनी केले. त्यांनी आयोजित स्पर्धेचे महत्व विषद केले.    उद्घाटन प्रसंगीं उपस्थित खेळाडूंनी उत्कृष्ट पथ संचलन करत मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी प्रबोधिनीच्या राष्ट्रीय खेळाडूंच्यावतीने मशाल मैदानावर फिरविण्यात येऊन उद्घाटक अपर जिल्हाधिकारी  रिता मेत्रेवार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटविण्यात येऊन स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा कार्यालयाचे संतोष वाबळे, शेख मोहम्मद, डॉ. रेखा परदेसी, सोपान शिंदे, संतोष प्रसाद , हारुण खान , राहुल गायके , सचिन मोहीते , सचिन दोरखे अमोल शिंदे मधुकर अंभोरे , क्रीडा प्रबोधिनीचे सर्व शिक्षक व खेळाडू तसेच नियुक्त केलेल्या विविध समित्यांचे पदाधिकारी देवा चित्राल , कैलास नाटकर , क्रीडा संघटक परिश्रम घेत आहेत. स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रभाकर काळे , उदय पंडया , अनिल नलावडे , सुजित माळी , अमोल मुटकळे , विजय जाहेर , योगेश सोळसे , नितीन येळवे , श्रीपाद लोहकरे , संभाजी यशवंते , विष्णू मोरे , प्रल्हाद काळे , तुकाराम करांडे आदी काम पहात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे