pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पंतप्रधान यांच्या हस्ते पीएम-सुरज पोर्टलचे अनावरण व कर्ज मंजूरीचा कार्यक्रम

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.12

पीएम-सुरज पोर्टलचे अनावरण व कर्ज मंजूरीचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन दि.13 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पीएम-सुरज पोर्टलचे अनावरण व कर्ज मंजूरी करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती व विकास महामंडळ आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ या राष्ट्रीय महामंडळामार्फत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग व सफाई कर्मचारी या गटातील एक लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जालना महानगरपालिका व जिल्ह्यातील इतर नगरपरिषद व नगर पंचायतीमधील सफाई कर्मचारी हजर राहणार आहेत. अशी माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे