pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

द्रोणागिरी येथे आरोग्य सेवा केंद्र सुरू करा “शेकाप नेते प्रितम म्हात्रेंची मागणी”

0 3 0 5 5 9

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

उरण तालुक्यात जेएनपीटी, दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशाप्रकारे मोठे उद्योग उरण परिसरात येत आहेत. तेथे येणाऱ्या रोजगारासाठी सुद्धा भारतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. सिडकोच्या माध्यमातून पुष्पकनोड, उलवे, द्रोणागिरी येथे मोठ्या प्रमाणात शहराची निर्मिती करण्यात आली. सिडकोने या ठिकाणी रस्ते, पाणी , वीज अशाप्रकारे सुविधा दिल्या आहेत परंतु तेथील वाढती लोकसंख्या पाहता आजही त्या अपुऱ्या आहेत.
आरोग्याच्या बाबतीत विचार केला असता ५०,००० पेक्षा जास्त नागरिक आज द्रोणागिरी नोड मध्ये भारतातील विविध क्षेत्रातून नोकरी निमित्त येथे येऊन रहात आहेत. या ठिकाणी राहणारे नागरिक हे सिडकोच्या माध्यमातून मिळणाऱ्या आरोग्य सेवेच्या बाबतीत आजही वंचित आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून आरोग्य सेवा केंद्र सुरू करावे जेणेकरून शासनाच्या सर्व आरोग्य सेवा आणि सुविधा तेथील नागरिकांना मिळतील. अशाप्रकारे मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पत्राद्वारे सिडको प्रशासनाकडे केले आहे.

————————————————————–

शहरीकरण करताना सिडकोने शहर वसवली परंतु अजूनही येथील नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अपुऱ्या आहेत. द्रोणागिरी येथे आरोग्य सेवे बाबतीत अजूनही उपायोजना नाही. द्रोणागिरीत होणारे आरोग्य केंद्र हे सिडकोच्याच माध्यमातून सुरू करण्यात यावे जेणेकरून तेथील नागरिक जो कर सिडकोला देतात त्या मोबदल्यात त्यांना सेवा सुविधा मिळतील.
– प्रितम जनार्दन म्हात्रे
खजिनदार
शेतकरी कामगार पक्ष रायगड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 0 5 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे