pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

 मधकेंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 23

राज्यात मध उद्योग हा केवळ शेतीपुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य उद्योग म्हणून केल्यास त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळेल. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिके व फळबागायतींच्या ठिकाणी व तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशाद्वारे पर-परागीभवन होऊन पिकाच्या उत्पादनात पिकांच्या प्रकारानुसार 5 ते 45 टक्के उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मधमाशांनी उत्पादित केलेल्या मधाच्या व मेणाच्या किमतीच्या 10 ते 15 टक्के अधिक आहे. त्यादृष्टीने मधमाशा पालन उद्योग हा सदर उद्दिष्टांशी सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणुन चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्व जिल्ह्यात मधकेंद्र योजना (मधमाशा पालन) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना महाराष्ट् राज्य खादी  व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येत असून यासाठी महाबळेश्वर जि. सातारा येथे मध संचालनालय कार्यरत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

अ)   योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता  —1.वैयक्तिक मधपाळ – पात्रता अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त. 2.केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ – व्यक्ती   वैयक्तीक केंद्रचालक (प्रगतीशील मधपाळ) पात्रता – किमान 10 वी पास, वय वर्षे  21 पेक्षा जास्त अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन,प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.  3. केंद्रचालक संस्था :- पात्रता – संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्त्वावर घेतलेली किमान 1 एकर शेतजमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान  1 हजार चौ.फु. सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशपालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले संस्था असावेत. ब) योजनेची वैशिष्टे –मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध  खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणांची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती. क)   अटी व शर्ती  – लाभार्थी निवड प्रक्रीये नंतर प्रशिक्षणांपुर्वी मध व्यवसाय सुरु करणे संबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य.           ड) अधिक माहितीसाठी संपर्क :-  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय,   एम.आय.डी. सी. एरिया, प्लॉट नं-7 जालना

फोन नं. 0242-220628 संतोष बगाटे मो.क्र. 982252534,                    Email.Id – dviojalna@rediffmail.com    2. संचालक, मध संचालनालय,  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं. 5      महाबळेश्वर, जिल्हा सातारा पिन – 412806 (दुरध्वनी – 02168-260264), असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे