pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानाअंतर्गत विविध पिकांच्या बियाणांचे मोफत वाटप

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि. 13 

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून चालु वर्ष साजरे करण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्यांचे क्षेत्र व उत्पादन वाढ करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानाअंतर्गत पौष्टिक तृणधान्य मिनिकिट वाटप व मिलेट क्रॉप कॅफेटेरिया बाबींची अंमलबजावणी सन २०२३ २४ मध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे. या मिनिकीटद्वारे मिळणाऱ्या धान्याचा वापर शेतकरी स्वतःच्या कुटुंबाकरीता करेल ज्यामुळे या अन्न  पिकांचा आहारातील समावेश वाढणार असून ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदो, राळा व राजगिरा या पिकांचे मिनिकीट बियाणे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला व राष्ट्रीय बीज निगम पुणे यांच्या मार्फत बियाणे मिनिकिट पॅकेट प्राप्त होताच तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्फत प्राप्त मिनिकिट पाकिटे शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार  आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी.आर.कापसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

तुर, सोयाबीन, कापूस पिकांमध्ये आंतरपीक/मिश्र पिक/ पट्टा पेर/बांधालगत पेरणी इ. पध्दतीव्दारे पेरणी, लावणी करण्याबाबतच्या सूचना कृषि सहाय्यकामार्फत देण्यात आल्या आहेत. मिलेट क्रॉप कॅफेटेरिया मध्ये पौष्टिक तृणधान्य अंतर्गत सर्व पोष्टिक तृणधान्य पिकांच्या सुधारीत तंत्रज्ञानावर आधारीत लागवड पध्दतीच्या प्रसार करण्यासाठी तसेच प्रत्येक गावामध्ये प्रत्येकी ५ आर क्षेत्रामध्ये २ शेतकरी यांच्याकडे मिलेट क्रॉप कॅफेटेरियाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी ज्वारी १ आर, बाजरी १ आर, नाचणी १ आर, राळा १ आर, कोदो १/२ आर राजगिरा १/२ आर याप्रमाणे क्षेत्रावर पिकांचे लागवड करिता बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी गावामधील इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून २ पेक्षा जास्त शेतकरी इच्छुक असल्यास स्थानिक पध्दतीने सोडत काढुन शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. क्रॉप कॅफेटेरियाच्या पिकाची सुधारित तंत्रज्ञानावर आधारित लागवड पध्दतीनुसार पेरणीपासून काढणी पर्यत सर्व कामे कृषि सहाय्यकाच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्यची वाढ होणे व सर्व शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

कडधान्याच्या क्षेत्र विस्तारासाठी कडधान्य पिकांच्या आंतरपीक पध्दतीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान- कडधान्य सन २०२३-२४ अंतर्गत खरीप हंगामात उडीद (AKU-१०-१) व तुर (BDN- ७१६), पिकाच्या या वाणाचे (४ किलो प्रति मिनिकिट) व सोयाबीन (फुले संगम ८ किलो प्रति मिनिकीट), भुईमुग (GIG-३२- प्रति मिनिकीट २० किलो प्रमाणे) बियाणे आत्माहत्याग्रस्त कुंटुब, दारिद्र रेषेखालील कुंटुब, विधवा महिला, कोरोनामुळे मुत्यु झालेल्या कुंटुबातील सदस्यांना प्राधान्याने मोफत वाटप करण्यात येणार आहे. असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4