pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 सी-व्हिजील ॲप समितीचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी,दि.14

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी सी-व्हिजील ॲप समितीचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्या अध्यक्षतेखाली टाऊन हॉल, जालना येथे संपुर्ण जालना जिल्ह्यातील फिरते पथक, स्थिर पथकांना सी-व्हिजील इन्व्हेस्टीगेशन ॲप व त्याअनुषंगाने निवडणूक विषयक तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
सी-व्हिजील ॲप अनुषंगाने सहायक जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी उमेश सपकाळ यांनी सी-व्हिजील ॲपबाबत संपुर्ण माहिती देवून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षणावेळी उपस्थितांची हजेरी नोंदविण्यात आली व अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.तुबाकले, श्री.देशपांडे, श्री.काटे, श्री.गायकवाड, श्री.फुलारी यांनी परिश्रम घेतले. असे नोडल अधिकारी, सी-व्हिजील ॲप समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे