pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दुर्गा देवी विसर्जनानिमित्त 24 ऑक्टोबरला वाहतुकीच्या मार्गात बदल

0 1 1 8 1 4

जालना/प्रतिनिधी,दि. 23

नवरात्र उत्सावानिमित्त नवदुर्गा देवी ची स्थापना झाली असून दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुर्गा देवी मुर्ती विसर्जन मिरवणुक शहरात पारंपारीक मार्गाने काढण्यात येणार आहे. मिरवणुकीच्यावेळी मिरवणुकीस अडथळा निर्माण होवू नये. रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहणे उभी राहून मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. या दृष्टीने दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून ते नवदुर्गा देवी मुर्ती विसर्जन होईपर्यंत वाहतुकीचे नियमनासाठी विसर्जन मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आदेश जारी केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,सराफा बाजार कडून येणारी वाहतुक व काद्राबाद चौकी, पाणीवेस मार्गे जुना जालनामध्ये जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओम हॉस्पीटल, मंगळ बाजार,राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन जुना जालनाकडे जाईल व येईल. जवाहरबाग चौकी परीसर,सदर बाजार,रहेमान गंज कडून येणारी व मामा चौक सुभाष मार्गे जुना जालनात जाणारी वाहतुक ही जुना मोंढा कमान,दिपक वाईन शॉप,बसस्थानक,लक्कडकोट व शिषटेकडी मार्गे जाईल व येईल.छत्रपती संभाजीनगर कडून जालना मोतीबाग बायपास रोडने अंबड व मंठा कडे जाणारी वाहतुक ही ग्रेडर टी पॉईन्ट,बायपास रोड,कन्हैया नगर,नाव्हा चौफुली,मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. भोकरदन,राजुर रोडने येणारी व ग्रेडर टी पॉईन्ट,मोतीबाग बासपास रोडने अंबड व मंठाकडे जाणारी वाहतुक ही बायपास रोड,नवीन मोंढा,कन्हैया नगर,नाव्हा चौफुली,मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. सदर बाजार परिसर,राष्ट्रीय हिंदी विद्यालय,बाबुराव काळे चौक,बुंदेले चौक मार्गे जेईएस कॉलेज, पोलिस प्रशिक्षण केंद्र गेट, जिजामाता प्रवेशव्दारकडे जाणारी वाहतुक ही जवाहरबाग चौकी, बडीसडक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जाईल व येईल. वरील आदेश दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून नवदुर्गा  विसर्जन होईपर्यंत अंमलात राहील.असे आदेशात नमुद करण्यात आले आ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4