मराठा समाजाला आरक्षणाची हदगाव आप ची मागणी
हदगाव/प्रतिनिधी,दि.24
मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागास असून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक नोकरीविषयक आरक्षण देण्याची मागणी समाज सातत्याने करीत आहे परंतु , न्यायालयात सातत्याने या आरक्षणास आवाहन मिळत आहे आणि सदरील आरक्षण नाकारले जात आहे त्याचा परिणाम म्हणून समाजामध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे यामुळे सामाजिक शैक्षणिक आणि नोकरीमध्ये हा समाज मागे राहत आहे त्यांचे मागासलेले पण दूर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करून कायमस्वरूपी आरक्षण देण्याची तरतूद करावी अशी मागणी आम आदमी पार्टी तालुका शाखा हदगाव ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे सदरील निवेदम उपविभागीय अधिकारी मा ब्रिजेश पाटील यांनी स्वीकारले आहे . यावेळी मा दिलीप खंदारे , मा कोषाध्यक्ष कैलास देशमुख , तालुका सचिव मा शिवाजी जोजार आणि तालुका संयोजक मा नागोराव गंगासागर हे उपस्थित होते .