मनाठा सपोनि संतोष शेकडे यांचा उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून गौरव

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.28
भारतीय 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदेड जिल्हा पोलीस दलात विशेष कामगिरी करण्या-या अधिकारी कर्मचारीवर्गाचा मान्यवराच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला आहे.
यामध्ये जिल्ह्यातील पोलीस विभागात स्वतःच्या कार्यक्षेत्रासह ईतर ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यात आपल्या सहकाऱ्याना सोबत घेऊन अतीशय सवेदनशील व गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यात यशस्वी ठरलेले मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते उत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या कार्याबद्दल नांदेड जिल्ह्यात विविध क्षेत्रातुन अभिनंदन व्यक्त होत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे , खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजीराव कल्याणकर , आमदार अमर राजुरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारीवर्ग ईत्यादी उपस्थित होते.