स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध
जालना/प्रतिनिधी,दि.7
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तिल यांनी जारी केले आहेत.



