ज्ञानेश्वर बोबडे यांचे आमरण उपोषण दोन दिवसानंतर सुटले !
काजळा फाटा ते सायगाव या रस्त्याचे कामासाठी आमरण उपोषनास बसलेले ज्ञानेश्वर बोबडे यांचे लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

जालना/प्रतिनिधी, दि.17
काजळा फाटा ते सायगाव या रस्त्याचे कामाबाबत उपोषणात बसलेले ज्ञानेश्वर बोबडे यांचे उपोषण आज लेखी आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे
सदरील कामाचे कार्यारंभ आदेश दि. 26/07/2024 एस.जी. देविदान यांना देण्यात आलेले आहेत. सदरील काम हे FDR Technology नुसार नविण पद्धतीने Design नुसार वरिष्ठ कार्यालयाची परवानगी व प्रयोगशाळेच्या प्राथमिक चाचणी अहवालानंतरच सदर पट्टयात काम सुरु करण्यात येईल. तोपर्यंत सदरील रस्त्यावर दोन ते तीन दिवसानंतर तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजवण्यात येईल असे आश्वासन ज्ञानेश्वर बोबडे यांना मिळाल्याने त्यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे.
तसेच सदरील कामाची मुदत एक वर्षापर्यंत म्हणजेच दि. 25.07.2025 पर्यंत आहे सदरील काम विहित मुदतीत पूर्ण करण्यात येईल त्यामुळे आपण उपोषण करण्याच्या मार्गापासून परावृत्त होऊन प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती कार्यकारी अभियंता (मुख्य कार्यकारी अधिकारी) महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा, जालना यांच्यावतीने करण्यात आली. त्यामुळे त्यांनी आपली उपोषण आज रोजी दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता आपले उपोषण मागे घेतले आहे