27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण
जालना/प्रतिनिधी,दि.25
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (‘अमृत’) पुणे आणिमहाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,जालना संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील उमेदवारांसाठी जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी एका उमेदवाराला याप्रमाणे मोफत आयात- निर्यातीवर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन दि. 27 जानेवारी 2025 रोजी करण्यात येत आहे. तालुका निहाय व्यक्ती यांना आयात- निर्यात या विषयावर मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणामध्ये विविध क्षेत्रात निर्यातीच्या संधी, आयात निर्यात प्रक्रिया काय आहे यासंबंधी तज्ञ व्याख्यात्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प समन्वयक विनोद तुपे व कार्यक्रम समन्वयक वैशाली कुलकर्णी (७३५०४१८४९२), यांच्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी), द्वारा मराठा पार्क बिल्डींग, विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना येथे अथवा दुरध्वनी क्र. ०२४८२-२२०५९२ वर संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.