चंद्रमनी गाडेकर यांची बहुजन समाज पार्टी च्या जालना जिल्हा अध्यक्ष पदी निवड.

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.11
एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते थेट आज बहुजन समाज पार्टी जालना जिल्हाध्यक्ष.
हा ध्येयवादी माणूस सातत्य पुर्ण गेल्या 30 ते 35 वर्षा पासून याच चळवळीतील एक सामान्य व साधा कार्यकर्ता म्हणून कायमस्वरूपी वावरत आहे..
प्रचंड प्रगल्भ विचार आणि चळवळी प्रती अत्यंत प्रामाणिक आणि स्थीर..
विचारात कधीही भेसळ न होऊ देता कायमस्वरूपी मा.कांशीराम साहेब यांना व त्यांच्या समाजपरिवर्तन विचाराला वाहुन घेत ते कृतीत अनुकरण करून जगणारे आंबेडकर चळवळीतील धुरंदर आणि अग्रणी बिणीचे नेतृत्व..
अगदी काल परवा पर्यंत संबिधान बचाव आंदोलन असो की संविधान जनजागृती असो समाजाप्रती काही तरी देणं लागते हि निखळ आणि निर्मळ भावना मनात घेऊन कायमस्वरूपी माणसं जोडत आणि जोपासत चालणारे धिरगंभीर नेतृत्व..
मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार आणि जालना जिल्हा हे सख्खे भाऊ शेजारी जिल्हे आणि हाच ऋणानुबंध धागा पकडून जेव्हा बहुजन समाज पार्टी ही उत्तर प्रदेश येथे आपल्या यशस्वीतेच्या उंबरठ्यावर होती तेव्हा महाराष्ट्रात आपली सत्ता प्रस्थापित व्हावी यासाठी रात्र दिवस झटणारे हे तरूण कार्यकर्ते मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे येत असत आणि कालकथीत स्मृतीशेष मेजर राजेंद्रसिंह जाधव नागवंशी जे आज ह्यात नाही त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात एक पिढी घडत होती आपल सर्वस्व समर्पण अर्पण त्याग करायची उर्मी आणि चळवळीची प्रेरणा गर्मी होती त्या काळात गाडेकर यांनी शाखे पासून सुरुवात केली आणि आजपर्यंत साहेब कायमस्वरूपी तिथेच राहिले आजपर्यंत आतापर्यंत ही चंद्रमनी गाडेकर म्हटलं तर आपसूकच ते बसपा वाले का..?? हिच यांची ओळख आणि इतिहास कुस बदलतोय आज पुन्हा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती नियुक्ती हा ख-या अर्थाने त्याग, समर्पण, आणि संपूर्ण संस्कारी कांशीविचारांना न्याय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
जी उर्जा तेव्हा होती तीच ऊर्जा आणि तोच आत्मविश्वास आजही कायम आहे..
असंख्य कार्यकर्ते यांची मोठ बांधलेली आहे आणि नक्कीच या पदाला न्याय देण्यात साहेब यशस्वी होतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या निवडी बद्दल समाजातील सर्व मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.