pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जुना शेवे ते हनुमान कोळीवाडा विस्थापित प्रवासात गेली ४० वर्ष गावाप्रमाणेच परदेशी वस्ती नागरी सुविधांपासून उपेक्षित .

0 3 2 1 8 1

नांदेड,दि.3

 

जुना शेवे ते हनुमान कोळीवाडा विस्थापित प्रवासात गेली ४० वर्ष गावाप्रमाणेच परदेशी वस्ती नागरी सुविधांपासून उपेक्षित .

●अनंत परदेशी यांनी केली खंत व्यक्त

●परदेशी कुटुंब पाण्यावाचून वंचित

●अनंत परदेशी यांनी मांडली कैफियत

 

देशाच्या पश्चिमेस आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई जवळ अवघ्या ८ कि.मीटर हाकेच्या अंतरावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने, पराक्रमाने पावन झालेली जननी म्हणून रायगडचा अभिमानाने नाव संपूर्ण जगामध्ये ओळखला जातो आणि तोच हा पराक्रमी शूरवीर राजेंचा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा मुंबईच्या सिमे लगत आणि जिल्ह्याच्या उत्तरेस अनंत वर्षाची गाथा सांगणारा तालुका उरण जगप्रसिद्ध ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या लेणी असलेला आणि अद्भुत अशा निसर्गाच्या अतुट सौंदर्याने नटलेला शेवे सुफलाम सुजलाम शेतीची अनेक मोठ मोठाळी कोठारे असणारा मिठाची मोठमोठाळे आगर आणि कायमस्वरूपी पोट भरून देणारा समुद्र किनारा आणि मासेमारी कोकणचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा हापुस आंबा, काजू, फणस, ताडाची व माडाची झाडी अश्या विविध सौंदर्याने रंगाने नटलेला समृद्ध गाव म्हणजे शेवे गाव तसं मोठं लोकसंख्येचे आणि क्षेत्रफळाच ग्रुप ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणाऱ्या या गावांमध्ये सर्व जातीपथाचे लोक राहत होते या गावापासून साधारणता दोन किलोमीटर अंतरावर गावठाणा बाहेर अनंत काळापासून पिढ्यान पिढ्या शेतावर घर बांधून राहणारी कुटुंब परदेशी कुटुंब शेतकरी, दुग्ध व्यवसाय , आधी प्रमुख व्यवसाय करणारे उदरनिर्वाहतेसाठी मासेमारी, मळे लावून भाजी पाला, आंबे काजू बोर असे अनेक व्यवसाय सीजन प्रमाणे घेणारे आणि स्वतः विकणारे आधी व्यवसाय या कुटुंबामार्फत करण्यात येत असत या व्यवसायातून आजूबाजूच्या गावातील गरजू लोकांना नियमित रोजंदारी व्यवसाय देणारे कुटुंब म्हणजे परदेशी कुटुंब परदेशी कुटुंबाला कुळात मिळालेली जागा अनंत परदेशी आणि त्यांचे इतर भाऊ जुना शेवा गावाचे कायमस्वरूपी चे रहिवाशी होते जुना कोळीवाडा वस्तीमध्ये त्यांचे स्वतःचे १००० स्क्वेअर फिट चे घर होते आणि शेतावर १२०० स्क्वेअर फिटचे स्वतःचे कुटुंबाचे एकत्रित होते. आजोबांचे शेतातील घर नंबर ६९/ब होते. वर्षाला सर्व भावांना, नातेवाईकांना मुलींना संपणार नाही एवढं भाताचे उत्पन्न, तसेच वर्षाचे बाराही महिने मळ्याचे भाजीपाल्याचे उत्पन्न सीझनमध्ये येणारे फळझाडांचे उत्पन्न बाजारपेठ मुंबई व उरण,न्हावा या ठिकाणी विक्री करता स्वतःच्या वैयक्तिक दोन बोटीनी / शिडाच्या होडीने त्यामुळे रानमाळ्याला भाजीपाला वेळेत बाजारपेठ मिळत होती स्वतःच्या वावरामध्ये शेतीमध्ये मालकीच्या चाळीस फुटाच्या दोन मोठ्या विहीर होत्या. मुळातच शेतकरी कुटुंब असल्याने भात शेती, आंब्याची बाग, मासेमारी मळ्याचे भाजीचे उत्पन्न असे पारंपारिक व्यवसाय एक नंबर करत असे या सर्व मुख्य दुग्ध व्यवसायाला सपोर्टिव्ह व्यवसाय केल्याने गुरांना चारा म्हणत असे तालुक्यातील सर्वात मोठा गुराढोरांचा तबेला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परदेशी कुटुंबियांकडे २०० म्हैशी व २५ गाई व लहान-मोठे जनावरे असे २५० पेक्षा जास्त जनावरे होती या जनावरांच्या मलमुद्रावर चालणारा गोबर गॅस हे देखील ग्रामपंचायत जुना शेवे यांच्या मार्फत व्यवसाय करता मिळणाऱ्या सर्व सुख सुविधा मिळत होत्या. गावातील शुभ अशुभ कार्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकाची नाळ ही माणुसकी दृष्टीने जोडली होती प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे सर्व जातीपदाचे नागरिक मोठ्या उत्साहाने आपले सण साजरे करत होते माणसाला माणसाची आवड होती भेटण्याची सवड होती एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत येत होते असा आमचा शेवे गाव जणू कुणाची दृष्ट लागाव्या यासारख्या बाबीने . १९७०-७१ मध्ये सिडको ने जीएनपीटी करिता भूसंपादन अधिकारी यांच्या माध्यमातून जमिनी कवडी मोलाने घेऊन शेतकऱ्याना भूमिहीन तर व्यवसाय भारतालाही संपविले तर ज्याचे रोजचे हातावर बोट असणारे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या माणसालाही उपासमारीची वेळ आणली आपण ते आजही पाहतो वाचतो भारतामध्ये असे सात मोठाले पोर्ट झाले परंतु यामध्ये कुठेही नागरिकांना विस्थापित करावे लागले नाही यावर ४० वर्षे झाली तरी ज्या ठिकाणी गाव वस्ती होती त्या ठिकाणी आजही कंपनीने पोर्टने काहीही केलेले नाही मग आमचे पुनर्वसन कशासाठी केले गेली ४० वर्ष हे पहात आहोत. यामध्ये १९८४ मध्ये न्हावा शेवा बंदराच्या दुस-या टप्प्यासाठी गावठाण जमीन संपादित करण्यात आली प्रकल्प कलम ४ मधील १० नोव्हेंबर १९८३ च्या शासन निर्णयात असे नमूद केले आहे की न्हावा शेवा बंदर प्रकल्पग्रस्त शेवा गावासाठी महाराष्ट्र पुनर्वसन प्रकल्प विस्थापित व्यक्ति (एमआरपीडीपी) अधिनियम १९७६ मधील खंड १७ उपखंड ५ लागू करण्यात आला होता. मौजे बोकडवीरा उरण येथे शेवे गावातील शेतकरी / बिगर शेतकरी कुटुंबीयांचे पुनर्वसन बोकडवीरा हद्दीत मौजे नवीन शेवा तर मौजे बोरीपाखाड़ी उरण येथे शेवा गावापासून ४००-५०० मीटर अंतरावर शेवे कोळीवाडावस्ती रहात होती त्या कोळी वस्तीतील शेतकरी /बिगर शेतकरी कुटुंबीयांचे पुनर्वसन मौजे बोरी पाखाडी खाजन या ठिकाणी हनुमान कोळीवाडा या नावाने ग्रामपंचायत स्थापन करून १९८५ मध्ये करण्यात आले . मौजे बोकडवीरा येथे नवीन शेवा आणि मौजे बोरिपाखाडी उरण येथे हनुमान कोळीवाडा येथील जमीनिवर पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली आणि याच ठिकाणी या एक गावातील वस्ती आणि गावठाणा बाहेरील सर्व घरांना जागा शासनामार्फत देण्यात आली व राजपत्र करून प्रसिद्ध करण्यात आले. जुना शेवे येथे गावठाणा बाहेर राहणारी ९ कुटुंबापैकी ५ कुटुंबाला गावामध्ये विकसित भूखंड दिले तर शेतावर राहणारे आम्ही परदेशी कुटुंबीयांना पारंपरिक व्यवसायामुळे गावातील नागरिकांनी आक्षेप घेतल्याने व मिळणारी गावातील विकसित भूखंड ४० चौरस मीटर ही अपुरी जागा तत्कालीन तहसीलदार यांनी विकसित ४ भूखंड दाखवले होते पारंपरिक व्यवसाय दुग्ध व्यवसाय असल्याने हे चाळीस चौरस मीटर चे विकसित भूखंड अपुरे पडणार होते होते, पुनर्वसनात मिळणारी अपुरी जागा शासन देत असल्याकारणाने आणि उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन असताना एकमेव दुग्ध व्यवसाय आणि जवळ २५० हून अधिक गुरे ढोरे व स्वतःच्या कुटुंबीयांना घरे कुठे बांधावे व गुरांचे गोठे कोठे बांधावे हा प्रश्न निर्माण झाला प्रशासनाकडे आम्ही दुग्ध व्यवसाय असल्याकारणाने कुटुंबातील उर्वरित हे फक्त व्यवसायावर अवलंबून आणि लेकर लहान त्यामुळे व्यवसायाव्यतिरिक्त उदरनिर्वाह करण्याचा दुसरे कोणतेही साधन आमच्याजवळ नव्हतं प्रत्येक भावा जवळ ४० ते ५० लहान मोठे जनावरे होती त्यामुळे आम्ही प्रत्येक भावंडाने किमान १५ गुंठे जागा मागणी त्यावेळेस तहसीलदार यांच्या मार्फत केले होती व ते मिळण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे विनंती विनिमय केले परंतु कुटुंबीयांना पुनर्वसनाच्या कायद्या अंतर्गत शेतकऱ्यास १.५० दीड गुंठा जागा कब्जे हक्काची रक्कम घेऊन पुनर्वसन कलेक्टर यांच्या आदेशाने सर्वे नंबर १८० अ/ १ अ यामध्ये ४ अविकसित भूखंड मंजूर केले व ते देण्यासाठी आदेशित केले या ठिकाणी देण्यात आलेले भूखंड हे अविकसित असल्याकारणाने आणि समुद्र खाजण असल्याने सदरचे भूखंड हे विकसित करण्यासाठी आम्हाला ८९ साली भराव करण्यासाठी २०० लोरी डंपरने माती शेव्याहून आणून भरावा करावा लागले जवळ असणारी २५० हून अधिक गुरेढोरे ,लहान मुले व गुरांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करण्याकरता गुरांचे गोठे भराव केलेल्या अविकसित भूखंडाला विकसित करून गुरांचे गोठे व राहण्यासाठी घर अशा गोष्टी कराव्या लागल्या २६./१०/१९८९ रोजी मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी पुनर्वसन कार्यालय, १-२३८९/८८ जिल्हाधिकारी रायगड यांचे कार्यालय अलिबाग दिनांक १५/११/१९८८. आदेशाने बोरिपाखाडी खाजन येथील सव्हे नंबर १८० अ/१अ मध्ये ४ अविकसित भूखंड प्रत्येक भावास दीड गुंठा प्रमाणे जागा देऊन आमची जणू फसवणूकच केली आहे. भूखंडाचा क्रमांक २३,२४,२५,२६ असे असून या पुनर्वसनामध्ये अधीन राहून शासनाच्या निर्णयाप्रमाणे भूखंडांचा ताबा कब्जे हक्काची रक्कम रुपये ११२५ (अकराशे पंचवीस) आकारून सदरचे भूखंड परदेशी कुटुंबीयांना हस्तांतरित केले आहेत. महोदय नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन्ही विस्थापित गावकऱ्यांना शासनाने त्यांना येण्यापूर्वी भराव करून १३ नागरी सुविधा सुख सोयी दिल्या आहेत मग विस्थापितांना देण्यात येतात त्या सुख सोयी परदेशी कुटुंबियांना का देण्यात आल्या नाहीत.शासनाने बोरीपाखाडी येथे अविकसित भूखंड दिले व ते विकसित करण्याकरता २०० हून अधिक लोरी ट्रक ने भराव देखील आमच्याच पैशाने करावा लागला यासाठी १९९० साली येण्यापूर्वी गुरे ढोरे विकून टाकावी असा प्रयत्न केला परंतु सर्व न विक्री झाल्यामुळे शेवे येथून उरण येथे १९९० ला आणाव्या लागल्या त्यावेळेस १८० म्हैसी व १० गाई करिता स्वतःच्या पैशाने सुख सोयी घ्याव्या लागल्या खरंतर एकूणच १३ नागरिक सुविधा पुनर्वसन कायदा अंतर्गत शासन देणार असं पुनर्वसनाधी म्हटलं जात होतं असं असताना या ठिकाणी आम्हाला ना सामान आणण्यासाठी गाडीसाठी चा मोबदला दिला, नाभराव, ना मागणी केलेली जागा , घर बांधण्यासाठी ऍडव्हान्स या सर्व सुख गुराढोरांना राहण्यासाठी जागा व सर्व सोयी आम्हाला स्वतःला कराव्या लागल्या नंतर घर बांधून झाल्यानंतर बोरीपाखाडी खाजण सर्वे नंबर १८० अ/१अ या सर्वे नंबर ला लागून असलेली व नव्याने स्थापन झालेली ग्रामपंचायत म्हणजे पुनर्वसित हनुमान कोळीवाडा या गावांमध्ये तहसीलदार यांच्या आदेशान्वये आमची घरे ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा या ठिकाणी समाविष्ट करण्याचे आदेश सरपंच व ग्रामसेवक यांना देऊन आम्हाला घर नंबर ११५ व ११६ असे घर नंबर देऊन समाविष्ट करण्यात आले आहे आज या ठिकाणी विस्थापित परदेशी कुटुंब त्यांची आजपर्यंत घरपट्टी ,पाणीपट्टी नियमित भरत असतात. आज ४० वर्षे उलटून गेल्यानंतर ज्या पद्धतीने कुटुंब वाढत आहेत लोकसंख्या वाढत आहे त्या पद्धतीने पुनर्वसन झालेल्या प्रत्येक कुटुंबास नागरिकास वाढीवगावठाण हे मंजूर केलं पाहिजे आणि १३ नागरी सुविधा या पुनर्वसन कायद्यांतर्गत दिल्या जातात त्या दिल्या पाहिजे अशी मी ज्येष्ठ नागरिक म्हणून विनंती करतो प्रशासनाने लक्ष घालावे देशाच्या उन्नतीमध्ये आमचाही खारीचा वाटा आहे .या प्रमाण आमच्या समस्या जाणून घ्या मी विनंती प्रशासनास करतो. आज विस्थापितांमध्ये नुकसान भरपाई म्हणून बऱ्याचशा गावागावांमध्ये आली परंतु माझेही त्या ठिकाणी व्यवसाय बुडालेला आहे मग मला व माझ्या कुटुंबांना जेएनपीटीने किंवा अन्य प्रशासनाने का नुकसान भरपाई दिले नाही? अर्ज भरून सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही ती कधी मिळणार ? कोण देणार? पाणी मागून सुद्धा विनंती करून सुद्धा गेले ९०दिवस मी आणि माझा परिवार पाण्यापासून वंचित आहे ट्रेन करणे पाणीपुरवठा विकत घेत आहे.
मला न्याय द्या मला न्याय द्या मला न्याय द्या
नाहीतर मी ज्या ठिकाणी पूर्वी राहत होतो त्याच ठिकाणी जाण्यासाठी मला कलेक्टर साहेब परवानगी द्या मी पत्रान्वये परवानगी परमिशन मागतो आहे . अशी मी प्रशासनाला विनंती करतो राष्ट्रपती साहेब ,पंतप्रधान साहेब ,मुख्यमंत्री साहेब, कोकण आयुक्त साहेब, कलेक्टर रायगड साहेब ,जिल्हा परिषदचे रायगड सीईओ साहेब, प्रांत साहेब जेएनपीटीचे, व्यवस्थापक साहेब, तालुक्याचे तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी साहेब ,पोलीस आयुक्त साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आपण मला कधी न्याय द्याल !मी न्याय मागतोय आणि जर न्याय मिळत नसेल तर मी काय करावं आपण सांगा मी तेही जबाबदारी आपल्यावर सोडतो.असे मत अनंत परदेशी यांनी व्यक्त केली असून मला व माझ्या कुटुंबाला, वस्तीला न्याय द्या अशी विनंती अनंत परदेशी यांनी केली आहे.

अनंत परदेशी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे